Home चंद्रपूर धक्कादायक :- एसीसी सिमेंट कंपनी अधिकाऱ्यांचा भ्रष्ट प्रताप झाकण्यासाठी तर कामगारांचा संप...

धक्कादायक :- एसीसी सिमेंट कंपनी अधिकाऱ्यांचा भ्रष्ट प्रताप झाकण्यासाठी तर कामगारांचा संप नव्हे ना ?

 

कंपनी गेट समोर अचानक आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या मागणी संदर्भात प्रश्नचिन्ह ?

घूग्गूस प्रतिनिधी :-

आज सकाळी 6:00 वाजता पासून जवळपास 78 कंपनीतील पॉवरप्लांटचे कामगार आपल्या ज्वलंत मागण्यासाठी आंदोलन करीत आहे, मिळालेल्या माहितीनुसार जर सायंकाळ पर्यंत हे कामगार परत पॉवर प्लांट मधे कामावर पोहचले नाही तर संपूर्ण पावरप्लांट ठप्प होऊ शकतो.
अवनीश लॉजिस्टिक प्राइवेट लिमिटेड (सप्र) या कंत्राटी कंपनी अंतर्गत हे सर्व कामगार एसीसी सिमेंट कंपनी मधे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या
कामगारांना जवळपास 5 महीन्या पासून 12 ते 15 ड्यूटी मिळत आहे ज्यामुळे कामगाराना पगार कमी मिळत असल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे, कामगारांचे म्हणणे आहे की त्यांना किमान 24 ते 26 ड्यूटी दिली जावी. परंतु महत्वाची बाब म्हणजे काही वर्षात आणि काही दिवसात एसीसी सिमेंट कंपनी मधे मोठ्या प्रमाणात सिमेंट घोटाळा कंपनी तून लोहा चोरी व सोबतच कोळसा रेती वाहतूक इत्यादी मुद्दे चर्चील्या जात आहे व नुकतीच कंपनीत ओव्हरलोड कोळसा वाहतूक प्रकरणी चौकशी होण्याची शंका लक्षात घेता अगोदरच नॉट फॉर सेल सिमेंट चोरी प्रकरणात सी आई डी चौकशी झाली आणि आता पुन्हा कंपनीत नौकर भरती मधे सुद्धा विवाद असल्यामुळे प्रसारमाध्यमांमधे आपली पोलखोल होण्याच्या भीतीने तर कामगारांना आंदोलन करायला लावण्यात आले नसेल ? अशीही शंका उत्पन्न होत आहे. कारण कुठलेही आंदोलन करताना कंपनी व्यवस्थापन याना किमान एक महिना आठ दिवसापूर्वी मागण्याची निवेदने व स्थानिक तालुका प्रशासन व पोलिस प्रशासन यांना माहिती द्यावी लागते त्यामुळे असले एकाच दिवशी सुरू झालेले आंदोलन हे कुठेतरी शंका निर्माण करीत असल्याने या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणे महत्वाचे असल्याची चर्चा राजकीय सामजिक आणि कामगार क्षेत्रात होत आहे.
विशेष म्हणजे कामगार नेते आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात अर्थपूर्ण जवळीक असल्याने कामगार युनियन मधे निवडणूक होत नाही आणि परंपरागत पद्धतीने इथे कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची गंभीर बाब सुद्धा स्पष्ट आहे. अर्थात आज सुरू झालेले आंदोलन सायंकाळ पर्यंत सुटेल अशी शक्यता वर्तवील्या जात आहे.

Previous articleचिंताजनक :- चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या कोरोनाबाधिताचा नागपूर येथे मृत्यू. बाधितांची संख्या 580 च्या वर.
Next articleवरोरा शहरातील सर्व प्रभागात फवारणी व फोगिंग चा वापर तात्काळ सुरु करा अन्यथा आंदोलन, छोटू भाई शेख यांचा इशारा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here