शासनाकडून मिळालेला निधी बनावट कामे दाखवून हडपल्याचे बिंग फुटल्याने सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई निश्चित?
कुरखेडा प्रतिनिधी :-
प्रभारी उपविभागीय वन अधिकारी यांनी भ्रष्टाचाराचे नवे किर्तिमान रचले असून 27 हजार झाडे लावण्याचे काम असो, वन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुमती शिवाय साहित्य खरेदी दाखवून परस्पर पैसे लाटण्याचा प्रकार असो की रस्ते बांधकाम दाखवून कोट्यावधीचा निधी हडप करण्याचा कारनामा असो सोनटक्के यांचे उपद्रव हे वनविभागाला लागलेली वाळवी ठरली आहे, परंतु आपले भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी त्यांनी वरिष्ठ वन अधिकारी आणि स्थानिक राजकारणी पत्रकार यांना मैनेज करून व चक्क वनमंत्री यांच्याकडे धाव घेवून निलंबनाच्या कारवाई पासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न चालवीलेला आहे. त्यासाठी त्यांनी रस्ते बांधकाम केलेच नाही ती बाब उघड झाली असल्यामुळे त्या रस्त्यांचे बांधकाम झाल्याचे दाखविण्यासाठी त्या ठिकाणी रस्ते बांधकाम सुरू केले होते पण त्या संदर्भात एका सामजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला असता acf द्वारे प्रत्यक्ष त्या कामांची पाहणी करून जे काम झालेच नाही ते दाखवण्याचा प्रयत्न सोनटक्के यांनी केल्याचे जाहीर झाले, या संदर्भात भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक यांनी dcf विवरेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की सदर बाबी चा अहवाल माझेकडे आला असून सोनटक्के यांच्यावर निश्चितच कारवाई होणार आहे, त्यामुळे आता सोनटक्के यांना कोण वाचविणाऱ? हा प्रश्नच असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे निश्चित आहे, शिवाय त्यांनी आतपर्यंत केलेल्या भ्रष्ट व रासलीला या संदर्भात पोलिस कारवाई चा अहवाल सुद्धा येणाऱ्या काळात समोर येणार असल्याने सोनटक्के यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही असेही संकेत मिळत आहे.