Home वरोरा बेधुंद मद्यपी दारूड्या युवकांकडून वाहतुक पोलिसाला मारहाण प्रकरणात चार आरोपींना अटकाव

बेधुंद मद्यपी दारूड्या युवकांकडून वाहतुक पोलिसाला मारहाण प्रकरणात चार आरोपींना अटकाव

उमेश कांबळे ता प्र) वरोरा 

भद्रावती कडे येणार्या चार दारूड्या युवकांनी भद्रावती पोलिस स्टेशनच्या एका वाहतुक शिपायाला मारहाण केल्याची घटना दि.5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान भद्रावती शहरातील अली पेट्रोल पंप समोर घडली.आकाश सुरज आञाम (19), विक्की राजु गुरूले (27) रा.दुर्गापुर, श्रीकांत मारोती खिरटकर (30) व रितेश महादेव उपरे(25) रा.वरोरा हे चार युवक दारू च्या नशेत स्कोडा या चारचाकी वाहन क्रमांक MH 43,A.F.6277 ने वरोरा वरून भद्रावती ला आले. दरम्यान, अली पेट्रोल पंप समोर वाहतुक नियंत्रण करण्याकरिता तैनात असलेले वाहतुक शिपाई प्रकाश नागोराव शेंद्रे यांनी सदर वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबवायला सांगितले. परंतु वाहन चालकाने आपले वाहन न थांबविता पुढे नेले. त्यामुळे वाहतुक शिपाई शेंद्रे यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून ते थांबविले असता या चारही युवकांनी शेंद्रे यांना मारहाण केली. त्यामुळे शेंद्रे यांनी लगेच घटनेचे माहिती पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले.या प्रकरणाची पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात आली असून वरील चारही युवकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.353, 332, 34 आणि दारू बंदि व मोटर वाहन कायद्याच्या कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास ठानेदार सुनिल सिंग पवार यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here