Home चंद्रपूर लक्षवेधी :- पालकमंत्री साहेब, जनता कर्फ्यू नक्की करा, पण जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक...

लक्षवेधी :- पालकमंत्री साहेब, जनता कर्फ्यू नक्की करा, पण जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक संकटाला पण घालवा

 

लक्षवेधी :-

जगात, देशात, आणि राज्यात कोरोनाच्या संक्रमण अवस्थेमध्ये सगळीच जनता भरगडली जात आहे, पण ज्या पद्धतीने कोरोनाची भीती प्रसारमाध्यमांनी आणि एकूणच येथील राज्यकर्त्यांनी जनतेत निर्माण केली त्या भितीमुळे खरं तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आपले मरण डोळ्यांसमोर दिसत आहे आणि त्या धास्तिनेच कितीतरी रुग्ण दगावले असल्याची माहिती आहे, काही वैद्यकीय एक्सपर्ट यांचे म्हणणे आहे की कोरोना हा फॉर्स आहे आणि जगातील सर्वात मोठे मेडिकल रैकेट आहे, आणि त्यामध्ये काही तथ्य सुद्धा दिसत आहे, कारण जर कोरोना वर अजूनपर्यंत कुठलेही औषध नाही त्यावर लस शोधल्या गेली नाही मग कोरोना रुग्णांना औषधे न देता रुग्ण आपोआप बरे होतात कसे ? हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न असून डॉ. बिस्वरूपराय चौधरी यांच्या मतानुसार कोरोना हा केवळ त्या कोरोना टेस्ट किट मधे आहे, त्यामुळे तुम्ही टेस्ट केली तर तुम्हाला कोरोना ची लागण झाली आहे असे ग्रुहीत धरल्या जाते अर्थातच त्या कोरोना टेस्ट किट सदोष आहे आणि त्यामध्येच कोरोना ची लागण होत असल्याचे ते ठामपणे सांगतात त्यामुळेच त्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,

आज संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचा परामर्श घेतला तर किमान भारतात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावले त्या रुग्णांना दमा अस्थमा, टीबी, हाय शुगर, कैन्सर, ह्रूदयरोग या मुख्य बिमऱ्या मुळे त्यांचा म्रुतु झाल्याचे दिसते, पण तरीही ते रुग्ण कोरोना मुळे मरण पावले असल्याची नोंद आहे, खरं तर देशात दरवर्षी वरील सर्व रोगांमुळे ५० लाखांपेक्षा जास्त लोक मरतात आणि कोरोना चा आकडा बघितला तर मागील सहा महिन्यात तेवढे कोरोनाचे रुग्ण पण नाही, मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशाने या कोरोनाची भीती  पसरवून अख्ख्या देशातील जनतेलाच वेठीस धरल्या जात असल्याची गंभीर बाब दिसत आहे. अर्थात कोरोना आहेच नाही अशी गोष्ट नाही पण त्याचा अति बाऊ केल्या जात आहे,त्यामुळे कोरोना विरोधात जणू आपण लढा पुकारला आणि त्यांवर आपण विजय मिळवू अशा बावट्या उठविल्या जाऊन जनतेत संभ्रम निर्माण केल्या जात आहे. पण यावर उपाय काय आहे ? हे किती दिवस चालणार ? आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे असे समजून आपण किती काळ लॉक डाऊन करणार आहो ? आणि जर नेहमी नेहमी आपण हेच करत राहिलो तर एक दिवस सगळा देशच पुनः लॉक डाऊन होईल आणि केवळ आर्थिक मंदीने आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढेल, कारण आज सगळे कामधंदे बंद झाल्यागत आहे. कंपन्यानी कामगार कर्मचारी यांना सुट्ट्या दिल्या आहे,चहा टपरी पासून तर हात ठेले छोटे व्यापारी यांच्यावर व छोट्या ऊद्दोगजकांवर आर्थिक मंदी आणि बैंक हप्ते भरण्याचे टेन्शन वाढत असल्याने हवालदिल होऊन काहींनी स्वतःला संपविण्याचा निर्णय केला आहे. लॉक डाऊन च्या काळात सरकारने घर भाडे घेवू नये अशी तंबी घर मालकांना दिली होती, आता तेच सरकार जनतेच्या लॉक डाऊन काळातील इलेक्ट्रिक बिल माफ करायला तयार नाही, रोजगार गेला काम धंदे बंद आणि सतत चे लॉक डाऊन यामुळे जनतेला काय कराव व काय करू नये या संभ्रमात जीवन जगावे लागत आहे अशातच पुन्हा कडक लॉक डाऊन करून लोकांना घरीच डांबून काय साध्य होणार आहे ? हेच कळायला मार्ग नसून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि जनता यांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु करण्यासंदर्भात जे आवाहन केले ते चूक आहे असे नाही पण ते करून कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यात खरंच आपण यश मिळवू का ? हा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने निश्चितच लॉक डाऊन च्या काळात चांगले निर्णय केले पण अजूनही मला काहीच झाले नाही, तरीही मला जोरजबरदस्तीने कोविड सेंटर मधे आणले, इथे जेवणात अळ्या आहे आणि जेवण निकृष्ट दर्जाचे आहे, शिवाय मला पॉझिटिव्ह म्हणून कोविड सेंटर वर ठेवल्यानंतर कुठलीही टेस्ट न करता दहा दिवसात मला घरी पाठविले आहे अशा तक्रारी वारंवार समोर येत असतांना आता जनतेला कोरोनाच्या या चक्रव्यूहातून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक झाले आहे, नाहीतर जनता कोरोना कोरोना करून आर्थिक मंदीत होरपळून जाईल त्यामुळे जनतेला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचा राजमार्ग शोधून काढा आणि मगच जनता कर्फू करा अशीच ह्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने लक्षवेधीच्या माध्यमातून अपेक्षा !

Previous articleक्राईम ब्लास्ट:- शिरपूर पोलिस स्टेशन बनले दारू तस्करांचे संरक्षक?
Next articleसनसनिखेज:- दारूमाफिया बंडू उर्फ प्रशांत आंबटकर यांची वरोरा क्षेत्रात कोट्यावधीची दारू तस्करी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here