News Now
Home > चंद्रपूर > धक्कादायक :- सत्तेचा दुरुपयोग करून कंचर्लावार कुटुंबियांची शहरात अनेक बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामे ?

धक्कादायक :- सत्तेचा दुरुपयोग करून कंचर्लावार कुटुंबियांची शहरात अनेक बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामे ?

 

सत्तेतुन पैसा आणि पैशातून सत्ता हा मुमंत्र जपनाऱ्या कंचर्लावार कुटुंबीयांनी मनपा हद्दीतील मौक्याचे भूखंड हडपले ?

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – ९

चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पक्षाचे संघटन वाढविण्यात ज्या काही मोजक्या लोकांचे योगदान आहे त्यात माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्वोच्य योगदान आहे, त्यांच्या सोबतीला असलेल्या अनेकांचे सुद्धा योगदान असल्याने भाजप चंद्रपूर महानगर पालिकेत आता सतत सत्तेत येत आहे . मात्र वसंता देशमुख, अनिल फूलझेले, अंजली घोटेकर, धनंजय हूड, सुभाष कासनगोट्टुवार, प्रमोद कडू राजेंद्र खांडेकर इत्यादींच्या अथक परिश्रमाने पक्ष उभा केला परंतु संजय कंचर्लावार यांनी काँग्रेस सोडून आपल्या पत्नी राखी कंचर्लावार सह सत्ता मिळविण्यासाठी भाजप मधे प्रवेश मिळवला आणि भाजपचे मनपामधे संख्याबळ जुळवल्या नंतर सत्तास्थापनेच्या वेळी राखी कंचर्लावार ह्या महापौर झाल्या,

महत्वाची बाब म्हणजे कंचर्लावार यांना महापौर पद हवे कशाला ? या प्रश्नाचे उत्तर जर शोधले तर आता उघड होत असलेल्या अनेक मोक्याच्या जागेवर यांनी व यांच्या नातेवाईकांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम वाचविण्यासाठी यांना सत्ता हवी आहे. खरं तर महाराष्ट्रच्या राजकारणात आपली प्रचंड ऊर्जा खर्ची घालणारे लढवय्ये नेत्रुत्व असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना कंचर्लावार कुटुंबियांमधे नेमके काय दिसले ? मुळात हेच कळायला मार्ग नसून त्यांच्या वडिलांनी ह्याच कंचर्लावार कुटुंबियांनी वडगाव डी.पी. रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ११६/४ या शाळेसाठी व नंतर क्रिडागंण यासाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण केले व तिथे बेकायदेशीर लॉन व कैटरिंग सुरू करून रोडवर सुद्धा अतिक्रमण केल्याने मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या, यात सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्यासह माजी मुख्य वन संरक्षण संजय ठाकरे, उद्दोजक चंद्रकांत गुप्ते, सुधीर ठाकरे, सुनील मामिडवार माडुरवार व इतरांच्या निवेदनात स्वाक्षऱ्या आहे, एवढेच नव्हे तर स्नेहनगर येथील शेकडो महिला व पुरुषांनी सुद्धा तक्रारी दिल्या पण सत्तेचा दुरुपयोग करून कंचर्लावार यांनी जवळपास १० कोटी पेक्षा जास्त किंमतीच्या जागेवरील आपल्या नातेवाईकांचे अतिक्रमण व बांधकाम वाचविले. परंतु कंचर्लावार यांच्या नातेवाईकांचे केवळ वडगाव प्रभागातच नव्हे तर भाणापेठ, जेटपुरा या प्रभागात सुद्धा बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम असून स्वतःच्या घरांचे बांधकाम सुद्धा बेकायदेशीर असल्याने यांना सत्तेत आणि पदावर राहण्याचा अधिकार आहे का ? हा गंभीर प्रश्न उभा राहत आहे. या संदर्भात भाजप मधे अंतर्गत कलह निर्माण होण्याचे लक्षण दिसत असून माजी पालकमंत्री आता भाजप सत्तेत कसे पालकत्व शीद्ध करणार ? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Top