Home चंद्रपूर धक्कादायक :- न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा कंचर्लावार यांचे श्रीकृष्ण मेडिकलचे बेकायदेशीर बांधकाम...

धक्कादायक :- न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा कंचर्लावार यांचे श्रीकृष्ण मेडिकलचे बेकायदेशीर बांधकाम मनपाने वाचवले ?

 

साई मंदिर वार्डातील राधे अपार्टमेंटला लागून असलेल्या रस्त्यांवर बेकायदेशीर बांधकाम, नगरसेविका सुनीता लोढिया यांच्या तक्रारीची पण दखल नाही. 

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – १२

चंद्रपूर महानगर पालिका म्हणजे काही धनदांडग्याच्या हातचे बाहुले बनली असून काही लोकांसाठी ती कर्दनकाळ ठरली आहे. मागील अनेक वर्षापूर्वी नगरसेवक असलेल्या संजय कंचर्लावार यांनी आपले बंधू
दत्तू कंचर्लावार यांच्यासोबत मिळून अनेक बेकायदेशीर अपार्टमेंट बनवले, आता तर स्वतः त्यांच्या पत्नी राखी कंचर्लावार ह्या महापौर असल्याने अख्खी महानगर पालिकाच त्यांनी कब्जात घेवून आपल्या कुटुंबीयांचे बेकायदेशीर बांधकाम व मनपाच्या जागेवरील अतिक्रमण जणू कायदेशीर असल्याचे प्रमाणपत्र वाटले, मात्र गोल बाजार येथील महानगर पालिका कॉंप्लेक्स मधील श्रीकृष्ण मेडिकलचे अतिरिक्त बांधकाम पाडण्याचे आदेश चक्क न्यायालयाने दिल्यानंतर सुद्धा जर महानगर पालिका ते पाडत नसेल तर मग स्वतः च कायदा हातात घेवून न्यायाधीशांसारखे आयुक्त आणि महापौर हे सामजिक कार्यकर्ते राजेश बेले यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश का देतात ? म्हणजे “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांच पहायचं वाकून “ अशी यांची व्रुत्ती.

दत्तू कंचर्लावार यांनी जेटपुरा गेट जवळील जनार्धन मेडिकल जवळील मनपाच्या जागेवर कब्जा केला. साई मंदिर वार्डातील राधे अपार्टमेंट जवळील रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे बांधकाम केले ज्याची तक्रार त्या वार्डातील नगरसेविका सुनीता लोढिया यांनी सन २०१७ मधे मनपा आयुक्त यांच्याकडे केली पण ते बांधकाम पाडून रस्ता मोकळा केला नाही, आणि गोल बाजार परिसरातील चक्क मनपाच्या इमारतीत फोडफाड करून तिथे आगाऊचे बांधकाम केले आणि ते पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले तरी ते बांधकाम पाडत नाही आणि दुसरीकडे स्वतःच्या जागेवर शामराव गेडाम यांनी विटाचे कंपाउंड़ केले तर त्यांचे कंपाउंड़ तोडण्याची घाई सहायक आयुक्त तत्काळ करतात आणि त्याच शामराव गेडामची जागा हडपुण व बेकायदेशीर दोन मजली इमारत नरेंद्र गेडाम बांधतो व ते बांधकाम पाडण्याचे आदेश तहसीलदार हे देतात पण तरीही महानगर पालिका त्यांचे बांधकाम वाचवितात, मग हे कसले भ्रष्ट मनपा प्रशासन ? खरं तर चंद्रपूर शहरातील जनतेने आता महानगर पालिकेच्या ह्या भ्रष्ट भोंगळ कारभारा विरोधात जनआंदोलन उभे करण्याची गरज असून मनपातील आयुक्त, झोन अधिकारी आणि अभियंते यांना सबक शिकवणे गरजेचे आहे, कारण इथे लोकशाही पद्धतीने कारभार चालत नाही तर हुकूमशाही पद्धतीने कारभार चालतो जो सर्वसामान्यांच्या हक्क अधिकाराला पायदळी तुडवित आहे.

महत्वाची बाब म्हणजे हे सगळं चित्र डोळ्यासमोर असताना या जिल्ह्याचे भाजप कर्णधार व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गप्प का आहे ? काय ते कंचर्लावार यांच्या या अवैध अतिक्रमण व बांधकामाला समर्थन देत आहे ? की आपले जवळचे आहे म्हणून त्यांची पाठराखण करीत आहे ? याचे उत्तर त्यांनी चंद्रपूर शहरातील जनतेला देणे अभिप्रेत आहे, कारण चंद्रपूर शहरातील जनतेने फक्त आणि फक्त त्यांच्यावरच विश्वास ठेवल्याने महानगर पालिकेत भाजपची सत्ता आली, त्यामुळे महानगर पालिका निवडणुकीत त्यांनी जी पारदर्शी स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देवू याची ग्वाही दिली ते प्रशासन नेमकं आहे तरी कुठं ? हे शोधण्याची वेळ चंद्रपूर शहरातील जनतेवर आली असल्याने आता चंद्रपूर शहरातील जनतेकडे मत मागण्यासाठी जाताना खरंच शहरातील जनता विश्वास ठेवेल का ? याच गांभीर्य त्यांच्यासह भाजप च्या पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी लक्षात घ्यावं अशी इच्छा येथील सुज्ञ नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here