Home चंद्रपूर खळबळजनक :- मनपाच्या प्राथमिक शाळेसाठी राखीव जागेवर राजेंद्र कंचर्लावार यांचा कब्जा?

खळबळजनक :- मनपाच्या प्राथमिक शाळेसाठी राखीव जागेवर राजेंद्र कंचर्लावार यांचा कब्जा?

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांची आयुक्तांकडे तक्रार पण कंचर्लावार परिवाराची मनपात सत्ता असल्याने कारवाई नाही ?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग-१३

चंद्रपूर मनपाचा कारभार म्हणजे “आंधळ दळत आणि बहिर पीठ खातं”  अशी जणू अवस्था झाली आहे. एकीकडे कंचर्लावार परिवारांनी शहरातील मनपाच्या मोक्याच्या जागेवर कब्जा केला व मंजूर नकाशा डावलून अतिरिक्त बांधकाम काही ठिकाणी केले, एवढेच नव्हे तर मनपाची बांधकाम मंजुरी नसताना बळजबरी बांधकाम केल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासन आंधळे बनतेय, मग बाकीच्या सर्वसामान्य जनतेचे अवैध बांधकाम तोडण्यासाठी यांना बळ येते कुठून ? हेच कळायला मार्ग नाही. कंचर्लावार परिवारांचे खुलेआम अवैध अतिक्रमण व बांधकाम शेवटी कुणाच्या बळावर आहे ? काय, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बळावर की मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पैशाने तोंड बंद करून ? याचा शोध लावणे चंद्रपूर शहरातील जनतेला आता अति आवश्यक झाले आहे, कारण सर्वसामान्य जनतेला एक नियम आणि सत्तेत असणाऱ्यांना एक नियम असतो कसा ? काय भारतीय संविधान सत्ताधारी यांना लागू पडत नाही ? विशेष म्हणजे सत्तेत राहून जर कायदा हातात घेता येत असेल आणि वाट्टेल तिथे अवैध अतिक्रमण व बांधकाम करण्याची मुभा मिळत असेल तर मग लोकांच्या मतांचा हा गैरवापर नाही का ? आश्चर्याची बाब म्हणजे चंद्रपूर महानगर पालिकेत विरोधकांनी या विरोधात आवाज उठवायला हवा तर ते सुद्धा मौन व्रत धारण करून कसे काय आहे? मग ही महानगर पालिका म्हणजे एका परिवाराची स्वायत्त संस्था आहे का ? हा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे,

महापौर राखी कंचर्लावार यांच्या परिवारांचे मनपाच्या जागेवरील अतिक्रमण व अवैध बांधकाम याची इति व्रूत्त मालिका सध्या गाजत असताना रोज नवनवे खुलासे समोर येत आहे, महापौर राखी कंचर्लावार यांचे दीर राजेंद्र
कंचर्लावार यांनी मौजा वडगाव स. क्र.११६/४ प्लॉट क्रमांक ३२, ३३ या शाळेसाठी राखीव असलेल्या मनपाच्या जागेवर कब्जा करून ते प्लॉट स्वतःच्या नावाने केल्याची खळबळजनक माहिती एका व्यक्तीने माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर समोर आली असून याच जागेची माहिती माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी मागितली होती व या ठिकाणी झालेले वॉल कंपाउंड़ तोडण्याची मागणी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत केली होती पण वर म्हटल्या प्रमाणे चंद्रपूर मनपा ही कंचर्लावार परिवाराची स्वायत्त संस्था झाल्याने चक्क तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांच्या अर्जाला सुद्धा मनपा आयुक्तांनी केराची टोपली दाखवली, यापेक्षा भाजप पक्षातील कार्यकर्त्यांसाठी व मनपा नगरसेवक यांच्यासाठी दूर्भाग्य ते कुठलं ? जर आयुक्त जेष्ठ नागरिक असलेल्या आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांच्या अर्जावर सुनावणी करीत नसेल व त्यांचा सन्मान करीत नसेल तर ह्या महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराची सामूहिक धिंड काढून यांच्या नौकऱ्या घालवण्यासाठी न्यायालयात दाद मागणे तेवढे जनतेच्या हातात उरले आहे, आणि कंचर्लावार यांचे नगरसेवक पद घालवणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे मात्र आता यासाठी कोण समोर येतो हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleअखेर वरोरा शहरातील नागरिकांच्या रात्रभर चाललेल्या अवैध कोळसा वाहतूक विरोधातील आंदोलनाला यश
Next articleसंतापजनक :- घूग्गूस पोलिस स्टेशनचे सचिन बोरकर व विनोद वानकर यांचे दारू माफियांसोबत अर्थपूर्ण सबंध ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here