Home चंद्रपूर काय मनपा आयुक्त बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या छबू वैरागडे यांचे नगरसेवक पद रद्द...

काय मनपा आयुक्त बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या छबू वैरागडे यांचे नगरसेवक पद रद्द करणार ?

 

सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांची महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार.

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – २८

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांच बघायचं वाकून” अशी मनोवृत्ती असलेल्या भाजप सत्ताधाऱ्यांची स्वतःची बेकायदेशीर बांधकामे व नझुल च्या जागेवर अतिक्रमण असताना इतरांचे अतिक्रमण मात्र तातडीने तोडण्यासाठी हे सदैव तत्पर असतात, असाच एक मामला समोर आला असून चंद्रपूर महानगरपालिकाच्या निवडणुकीत जटपूरा प्रभाग क्र. ७ या वार्डातून ओ.बी.सी. महिला ह्या राखिव प्रवर्गातून भारतीय जनता पक्षा कडून निवडून आलेल्या छबू वैरागडे यांचे मोहल्ला जटपूरा १, आवक जावक लिपीकर शिट क्र. १९, भूमापन क्र. १७६४ हि मालमत्ता असून त्यावर त्यांचे दोन मजली घर आहे. नगरसेविका व त्यांचे पती यांनी सदरहू मालमत्तेवर १३ वर्षापूर्वी घराचे बांधकाम सुरु केले व सदरहू बांधकाम करीत असतांना नगरसेविका व त्यांचे पती यांनी त्यांच्या मालकीच्या भूमापन क्र. १७६४ या जागेच्या बाजूला असलेल्या सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केले व त्यावर बांधकाम केले आहे, सदरहू अतिक्रमण केल्यानंतर त्यांना महानगरपालिका मार्फत अतिक्रमण काढून टाकण्यासंबंधात नोटीस सुध्दा दिलेले होते, परंतु महानगरपालिकेत भाजप सोबत जुळलेल्या व नंतर निवडून आलेल्या छबू वैरागडे यांच्या बेकायदेशीर बांधकाम संदर्भात मनपा द्वारे कारवाई करण्यात आली नाही.

चंद्रपूर महानगरपालिकेंच्या निवडणुकीमध्ये जटपुरा प्रभाग क्र. ७ मधून उभे राहाण्याकरिता छबू वैरागडे यांनी निवडणूक अधिकारी समक्ष अर्ज सादर करतांना हेतूपरसपर आपल्या घरच्या बांधकाम संदर्भातील बाब लपऊन ठेवली व निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतरही स्वतःचे सरकरी जमिनीवरचे अतिक्रमण काढले नाही व आताही त्यांच्या पतीने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन बांधकाम केलेले आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १०(१-ड) नुसार एक प्रकारे कायद्याचे उल्लंघन केले असल्याने नगरसेविका छबू वैरागडे यांच्या बेकायदेशीर बांधकामाची चौकशी करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त व नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे. आता या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका छबू वैरागडे यांचे नगरसेवक पद मनपा आयुक्त खरंच रद्द करणार की सत्तेपुढे नतमस्तक होणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleधक्कादायक :- पैनगंगा कोळसा खाणीतील दोन गटातील हल्ल्यात गडचांदूर पोलिसांनी का दाखल नाही केला गुन्हा ?
Next articleमनसेचा उद्धव ठाकरे सरकारवरला अल्टिमेट ‘सोमवार’पर्यंत प्रश्न निकालात काढा नाहीतर ……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here