Home भद्रावती मनसे धमाका:- माजरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश,

मनसे धमाका:- माजरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश,

 

मोहसिन खान यांची भद्रावती तालुका सचिव म्हणून नियुक्ती.जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

माजरी प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात सद्ध्या पक्ष बांधणीला वेग आला असून जनतेच्या मूलभूत अधिकार आणि हक्कासाठी विविध आंदोलने सद्ध्या सुरू आहे अशातच मोहसिन खान यांच्या नेत्रुत्वात माजरी परिसरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसे नेते रमेश राजूरकर व मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.आजवर विविध नेत्यांच्या भुलथापाना बळी पडलेल्या युवा कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच खरा पर्याय असून स्थानिक भुमीपुत्राच्या हक्क अधिकारासाठी मनसे सदैव अग्रेसर आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरातील कंपन्या मधे स्थानिक युवा कार्यकर्त्यांना निश्चितच संधी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवटच्या क्षणापर्यंत लढेल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष दिलीप राणेडवार यांनी कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना दिली याप्रसंगी मनसे नेते तथा यशस्वी उद्दोजक रमेश राजूरकर यांनी बेरोजगारी यावर कशी आपण मात करू शकतो यांचे उदाहरण देवून कार्यकर्त्यांमधे जोश भरला.

माजरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले व या कार्यालयातून माजरी परिसरातील जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविल्या जातील व त्यातून पक्ष संघटन वाढेल असा आशावाद मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी व्यक्त केला, याप्रसंगी मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे विवेक धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here