Home चंद्रपूर धक्कादायक :- प्रेमात आंधळ्या अल्पवयीन मुलीवर प्रियकर व मित्रांनी केला सामूहिक बलात्कार,

धक्कादायक :- प्रेमात आंधळ्या अल्पवयीन मुलीवर प्रियकर व मित्रांनी केला सामूहिक बलात्कार,

 

दूर्गापूर वेकोलि परिसरातील निर्जन स्थळी बोलवून बलात्कारा नंतर केली जबर मारहाण, पीडित मुलगी कोमात?

चंद्रपूर :-

जिल्ह्यात प्रेम प्रकरणाच्या घटना सामाजिक आरोग्य बिघडवत असून रोज नवनव्या घटना समाजमनाला हादरे देत आहे, अशीच एक धक्कादायक घटना तूकूम दूर्गापूर परिसरात घडली असून दिनांक २५/०१/ २०२७ रोजी तुकुम परीसरात राहणा-या एका मुलीला तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रानी दूर्गापूर वेकोलि परिसरातील निर्जन ठिकाणी तीचेवर जबरन बलात्कार करून तिला जबर मारहाण केली व पसार झाले होते. सदर पिडीत मुलगी घटनेच्या तारखेपासुन जिल्हा सामान्य रूपनालय चंद्रपुर येथे आयसीयु मध्ये उपचार घेत आहे मात्र अजूनही तिची प्रक्रुती स्थिर असून आरोपी वर भांदवी कलम
३७६,३२४,३२६ ३४ अन्वये नोंद करण्यात आला असुन मुख्य आरोपी मुलीचा प्रियकर गौरव उर्फ आशीश अनिल पिंपळकर रा सुगत नगर तुकुम यास त्वरीत अटक करण्यात आली आहे. मार्गदर्शनात सपोनि बावनकर करीन आहे.तर मुलीच्या बयाना नुसार आरोपी चार असून हा गैगरेप असल्याचे दिसून येते अर्थात आता एका आरोपीला अटक केल्यानंतर नेमकी काय घटना होती म्हणजे प्रेम प्रसंगातून की इतर बाबी मुळे बलात्कार व नंतर जबर मारहाण करण्यात आली याची खरी गोम पोलीस तपासा नंतर प्रकाशात येईल असे दिसत आहे.

Previous articleखळबळजनक :- ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झालेला उमेदवार लगेच पायउतार?
Next articleब्रेकिंग न्यूज ;- मनसेचा नवा मेगाप्लॅन तयार, राजसाहेब ठाकरें अयोध्येला जाणार,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here