Home लक्षवेधी आश्चर्य :- वर्गमित्र असलेले दोन प्रशासकीय अधिकारी बीड जिल्ह्यात लाच स्वीकारताना अटक.

आश्चर्य :- वर्गमित्र असलेले दोन प्रशासकीय अधिकारी बीड जिल्ह्यात लाच स्वीकारताना अटक.

 

दोन दिवसाच्या फरकाने दोन्ही वर्गमित्र एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने सर्वत्र आश्चर्य.

बीड न्यूज नेटवर्क :-

कधी कोण कुठे केंव्हा भेटेल व कधी कुठे काय होईल याचा नेम नसलेल्या या जीवनात कधी कधी योगायोग असा जुळून येतो की क्षणात होत्याच नव्हत होत असतं अगदी असाच एक प्रसंग बीड जिल्ह्यात घडला असून श्रीकांत गायकवाड आणि नारायण मिसाळ असे दोन अधिकारी त्यापैकी एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा गटविकास अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर दोघेही दोन दिवसाच्या आड एसीबी च्या जाळ्यात अडकतात याचे आश्चर्य व्यक्त होत आहे,

श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नारायण मिसाळ हे पाटोदा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. दोघेही एक दुसऱ्याच्या संपर्कात होते दोघांनीही चांगली मेहनत घेऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं पण त्याच बरोबर पैशाची हाव आणि जिवाला वैताग करून घेतलेल्या दोन्ही मित्रांनी मोठा पगार असतांना सुद्धा अतिरिक्त पैसे कमविण्याच्या नादात स्वतःचे अस्तित्व गमावले विशेष म्हणजे दोघे मित्र दोन दिवसाच्या फरकाने लाचलुचपत विभागाच्या कारवाईत फसणे हा योगायोगच म्हणावा लागेल.

श्रीकांत गायकवाड यांना 65 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. माजलगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आपल्या चालकामार्फत त्यांनी ही लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एकदिवस आधी त्यांचे वर्गमित्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना देखील लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे मिसाळ यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते.

Previous articleन्यायनिवाडा:- आष्टी येथील विनयभंग करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा.
Next articleकोरोना अपडेट :- गत 24 तासात 22 कोरोनामुक्त तर 29 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here