Home राष्ट्रीय लक्षवेधी :- मोदी सरकारच्या अहंकारी व्रुत्तीने कोरोनाचा इलाज झाला महाग आणि मरण...

लक्षवेधी :- मोदी सरकारच्या अहंकारी व्रुत्तीने कोरोनाचा इलाज झाला महाग आणि मरण झालं स्वस्त

 

स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील.

लक्षवेधी:-

देशात मोदी सरकारच्या अहंकाराने सगळी शासन व्यवस्था ही एखाद्या मरणासन्न अवस्थेत पोहचली असून कोरोना महामारीत रोज हजारो नागरिकांचा ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व्हेंटिलेटर्स आणि बेड मिळाले नाही म्हणून जीव जातं आहे, काही रुग्णांचे बळी तर बेड मिळाले नाही म्हणून रस्त्यांवर आणि अम्बुलंस मधेच जातं असल्याचे विदारक द्रुष्य बघावयाला मिळत आहे पण पंतप्रधान मोदी यांना फक्त निवडणुका महत्वाच्या वाटतात आणि सत्ता महत्वाची वाटते त्यामुळे “भाड मे जाये जनता अपना काम बनता” या सदरात मोदींची तुलना करावीशी वाटते.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज हजारो नागरिकांना आपला जीव गमावावा लागत आहे. आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत. अशात केंद्र सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांसोबतच भाजप चे नेते आणि लोकप्रतिनिधी सुद्धा करत आहे कारण कोरोना च्या या संकटकाळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत राहिले. तर कोरोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, त्यामुळे आता आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून रुग्णालयातरुग्णांची मोठी आर्थिक लूट होतांना दिसत आहे तर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगाच्या रांगा ह्या मरण स्वस्त आणि उपचार महाग असल्याचे चिन्ह आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकार्यक्षम नेत्रूत्वाचे फलित आहे असे म्हणावे लागेल

आज देशात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. पण स्मशानभूमीत म्रूतदेह जाळायला लाकडे सुद्धा कमी पडत आहे.यामुळे नातेवाईकांच्या मनात मोठा आक्रोश आहे. जणू हे मानवतेच्या विरोधात आहे. नव्हे मोदी सरकारचा हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अंहकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे, त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’ अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Previous articleकोरोना वार्ता :- 24 तासात 1741 कोरोना पॉझिटिव्ह तर 29 बाधितांचा मृत्यू.
Next articleआफ्रोह रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माधुरी घावट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here