Home महाराष्ट्र आफ्रोह रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माधुरी घावट.

आफ्रोह रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माधुरी घावट.

गुहागर: (प्रतिनिधी)

ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन (आफ्रोह) या कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ.माधुरी घावट यांची निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्षपदी सौ.उषा पारशे व सचिव म्हणून श्रीमती माधुरी मेनकार यांची निवड करण्यात आली .

नुकताच आफ्रोह रत्नागिरीच्या महिला आघाडीच्या ऑनलाईन झालेल्या सभेत सर्वानुमते जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष सौ.माधुरी घावट या पाटपन्हाळे उपकेंद्र येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत . उपाध्यक्ष सौ.उषा पारशे या संगमेश्वर तालुक्यात आरोग्य सेविका तर श्रीमती माधुरी मेनकार या दापोली तालुक्यातीलइनामपांगारी येथील शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

आफ्रोह रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीबाबत मनोदय व्यक्त करताना सौ.माधुरी घावट म्हणाल्या की मला सेवेत पुनर्स्थापन करण्यासाठी आफ्रोहने 15 ऑगष्ट 20 ला आत्मदहन आंदोलन केले.त्याचे ऋण मी कसे फेडणार? मी अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने अग्रेसर राहून आफ्रोहचे ऋण फेडण्याचा नक्कीच प्रयत्न करी असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ.माधुरी घावट यांच्यासह उपाध्यक्ष उषा पारशे,सचिव माधुरी मेनकार यांच्या निवडीबाबत आफ्रोह महिला आघाडीअध्यक्षा अनघा वैद्य, आफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियाताई खापरे , अमरावती विभागप्रमुख निताताई सोनवंशी, आफ्रोह रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर,उपाध्यक्ष सिंधुताई सनगळे,सचिव बापुराव रोडे यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleलक्षवेधी :- मोदी सरकारच्या अहंकारी व्रुत्तीने कोरोनाचा इलाज झाला महाग आणि मरण झालं स्वस्त
Next articleचिंतनीय :- पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी उभारले ११०० बेड चे कोविड हॉस्पिटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here