Home चंद्रपूर चिंतनीय :- पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी उभारले ११०० बेड चे कोविड...

चिंतनीय :- पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी उभारले ११०० बेड चे कोविड हॉस्पिटल.

 

मग चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार आमदार व नगरसेवक काय झोपेत आहे का?

कोरोना चिंतन :-

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मोठ्या प्रमाणात हाहाःकार माजवलाय आणि आरोग्य व्यवस्था पूर्णतया कोलमडून पडली आहे. अशातच जे लोकप्रतिनिधी निवडणुकीत जनतेला मोठमोठी आश्वासने देतात आम्ही रोजगार देऊ. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू. चांगले आरोग्य राखण्यासाठी सुविधा देऊ म्हणून भर सभेत घोषणा देऊन टाळ्या मिळवतात. प्रसंगी मतदारांना पैसे वाटप करून मतदान विकत घेतात मग आता जेंव्हा कोरोना व्हायरस चे भारी संक्रमण होऊन रोज हजारो लोकांचा जीव जात आहे तेव्हां हे खासदार आमदार आणि नगरसेवक कुठल्या बिळात लपलेले आहे ? हेच कळत नाही.

सद्ध्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी कोविड हॉस्पिटल उघडले तर मनसेचे पुणे नगरसेवक तात्या मोरे यांनी सुद्धा ८० बेड चे कोविड रुग्णालय उघडले त्यापुढे जाऊन नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तब्बल ११०० बेड चे कोविड हॉस्पिटल उघडून आपली सर्वोच्य कामगिरी केली आहे, मग चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार आमदार व नगरसेवक यांना ही कामगिरी का करता आली नाही? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असून खरं तर जिल्ह्यात कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला हेच लोकप्रतिनिधी जबाबदार आहे अशी ओरड सर्वत्र होतं आहे.

जिथे कित्तेक लोकप्रतिनिधी आपले हात झटकून शासन प्रशासनाला दोष देत घरी बसले असतांना मतदारसंघातील नागरिकांना आकस्मिक चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं आहे. शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर असं त्यांनी या सेंटरला नाव दिलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निलेश लंके यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारलं होतं. “आपलं काय व्हायचं ते होऊ द्या. जर मी घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोकं सुरक्षित असली पाहिजेत,” असं म्हणत लंके हे दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहेत. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो त्यांचा कुटुंबप्रमुखही असतो, अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लंके यांनी कोविड सेंटरची उभारणी केली होती. त्यानंतर त्यांनी उभापलेल्या शरद पवार आरोग्य कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून ते स्वत: दिवसरात्र या ठिकाणी रुग्णांची संवा करत आहेत. सध्या लंके हे पुन्हा एकदा आपल्या कामामुळे चर्चेत आले आहे. पारनेर तालुक्याती भाळवणी या ठिकाणी लंके यांनी ११०० बेड्सचं कोविंड सेंटर सुरू केलं आहे. यामध्ये १०० बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत.

चंद्रपूर जिल्हा हा औद्दोगिक जिल्हा आहे  व आपले लोकप्रतिनिधी यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची संपती असतांना त्यांच्या मनाचा उदारपणा संपला की मेला हे कळायला मार्ग नसून जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात पुरेसे रेमडेसिविर इंजेक्शन,ऑक्सिजन बेड सह साधे बेड नाही, व्हेंटिलेटर्स नाही त्यामुळे रुग्णांचा रस्त्यात व अम्बुलंस मधे जीव जातं आहे इतकेच काय स्मशानात म्रूतदेहाच्या रांगा लागल्या आहे अर्थात आरोग्य व्यवस्था पूर्णतया कोलमडली आहे, अशातच आपले लोकप्रतिनिधी हे केवळ शासन प्रशासनाकडे मागणी व सल्ले देत फिरत आहे. पण प्रत्यक्षात क्रुती दिसत नाही पण  जिल्ह्यातील जनतेला आता आरोग्य सुविधा तत्काळ पोहचवीने आवश्यक झाले आहे. याचे चिंतन करून खासदार आमदार आणि नगरसेवक यांनी आपआपल्या स्तरांवर आरोग्य सुविधा द्याव्या अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here