Home महाराष्ट्र खळबळजनक :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लवकरच येईल तिसरी लाट?

खळबळजनक :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लवकरच येईल तिसरी लाट?

 

कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगता येत नाही. वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने यांची माहीती.

कोरोना वार्तापत्र :-

एकीकडे देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वजण त्रस्त आहेत. ही लाट ओसरण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. असं असतानाच कोरोनाची तिसरी लाट देखील धडकणार आहे.
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल,” असा इशारा महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणा कोलमडून गेली. त्यातच, तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिलाय. कोव्हिड-19 ने देशभरात हा:हाकार माजवलाय. ही लाट नाही, त्सुनामी आहे. या शब्दात डॉक्टर परिस्थितीचं वर्णन करतायत. देशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गाने विक्राळ रूप धारण केलंय. तज्ज्ञांच्या मते, सद्य स्थितीत आपण दुसऱ्या लाटेच्या मध्यभागी आहोत. ही लाट संपूर्ण ओसरायला अजून महिनाभर जाईल. असं मत बीबीसी मराठीच्या वेबिनारमध्ये इंडियन कॉलेज ऑफ फिजिशिअन्सचे अधिष्ठाता आणि टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी कोरोनासंसर्गाची तिसरी लाट, लसीकरण अशा विविध विषयांवर आपली मतं मांडली.

कधी येईल कोरोना संसर्गाची तिसरी लाट?

संसर्गाच्या लाटा (वेव्ह) येत असतात. कोरोना संसर्गाच्या चार ते पाच लाटा येतील. अमेरिकेतील मिशिगन आणि फ्रान्समध्येही संसर्गाची चौथी लाट आलीये. त्यामुळे, तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि तीव्रता कशी कमी करता येईल. याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोरोना संसर्गाची चेन-ब्रेक करण्यासाठी आपण निर्बंध घातले. यावेळी अनलॉक योग्य पद्धतीने केलं नाही. लोकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही. गलथानपणा केला तर, सप्टेंबरमध्ये तिसरी लाट 100 टक्के येणार.

कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगता येत नाही.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडादेखील वाढला आहे. अशातच टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी यावर भाष्य केले आहे. साथीच्या रोगामध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगता येत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केल्याचे लहान म्हणाले.

Previous articleकृषिवेध :- मंडणगड पं.स.चा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम,: 40,000 हळद रोपांची तयारी पूर्ण
Next articleशिंदे परिवाराचे पुन्हा एक योगदान, शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील ओपीडी निशुल्क.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here