Home वरोरा आदर्श :- स्वतःच्या वाढदिवशी मुन्ना पाठक यांनी गरजूंना वाटले कपडे व अन्नधान्य.

आदर्श :- स्वतःच्या वाढदिवशी मुन्ना पाठक यांनी गरजूंना वाटले कपडे व अन्नधान्य.

 

सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाठक यांचे वरोरा शहरात सर्वत्र कौतुक.

वरोरा प्रतिनिधी :-

सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाठक यांनी आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून गरीब गरजुना कपडे व अन्न धान्य वाटप करून आपले सामाजिक दायित्व निभावले असून तरुण युवकांसमोर आदर्श निर्माण केले आहे. वरोरा येथिल सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाठक यांनी आपल्या 25 व्या वाढदिवसानिमित्य कोरोनाचे वाढते संक्रमण आणि लॉक डाऊन मधे गोरगरिबांच गेलेला रोजगार यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आलेली उपासमारीची पाळी लक्षात घेता आपला वाढदिवस धुम धडाक्यात साजरा न करता अत्यंत गरीब व होतकरु लोकांना शर्ट ,साडी व मास व 3 किलो चे अन्न धान्य पाँकेट तयार करुन वाटप केले.

मुन्ना पाठक यांच्या या कार्याने वरोरा शहरात त्यांचे कौतुक केल्या जात आहे त्यांच्या जन्मदिना निमित्त वरोरातील प्रतिष्ठित व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी वाटसप , फेसबुक व सोसल मिडीया दारे व फोन दारे त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या या उपक्रमात सहकारी अभिनंव ऊरकांदे ,शाहिल वाभिटकर ,विनीत देठे .आदित्य ,कुणाल , मुन्ना पाठक यांच्या जन्मदिना सहकार्य केले..

Previous articleआरोग्य वार्ता :-राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आरोग्य निदान शिबिराचे आयोजन.
Next articleधक्कादायक :- कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here