Home भद्रावती अभिनंदनिय :- भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवाराच्या संयुक्त उपक्रमाची कोरोना रुग्णांसाठी...

अभिनंदनिय :- भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवाराच्या संयुक्त उपक्रमाची कोरोना रुग्णांसाठी पुन्हा एक अनोखी भेट.

 

सीडीसीसी बैंक संचालक रवींद्र शिंदे यांनी डॅा. विवेक शिंदे यांचे मागॅदशॅनात कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर केले उपलब्ध.

कोरोना न्यूज नेटवर्क :-

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि वाढत असलेला मृत्युचा आकडा अशा भयावह स्थितीत जिथे लोकप्रतिनिधी हे स्वतः पुढाकार घेवून एखादे कोविड सेंटर काढण्यासाठी धजावत नसतांना किंव्हा स्वतःचे कार्यालय,भवन वा घर कोविड सेंटर करिता उपलब्ध न करता ते केवळ प्रशासनावर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे शिंदे परिवाराने राजकारणाच्या पलीकडे जाऊन भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार यांचा संयुक्त उपक्रम राबविला आणि स्वतःचे मंगल कार्यालय प्रशासनाला मोफत देऊन तेथे ४०० बेड चे सूसज्य व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारून ते प्रशासनाकडे सुपूर्द केले.

या कोविड सेंटरमधे त्यांनी  रुग्णांना मोफत जेवणाच्या सुवीधेसह इतर सुविधा निर्माण करून दिल्या. ते एवढ्यावरच थांबले नाही तर तिथे सॅनिस्ट्रायजरची सोय, प्रशासनाच्या मागणी प्रमाने औषधीची सोय उपलब्ध करुन दिली, जे कोरोना रुग्ण घरीच होम कॉरॉनटांइन आहे त्यांना हेल्प लाईन व्दारे मार्गदर्शन व उपचारांची सोय केली आणि जिल्हयात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स बेड च्या व्यवस्थेसाठी गंभीर रुग्णांना बेड मिळवून देण्यास मदत, कुठल्याही रुग्णांना शिंदे परिवाराने स्वतःच्या खाजगी रुग्णालयात निःशुल्क ओपीडी सुरू केली.एवढेच काय तर डॅाक्टरच्या मागणीनुसार प्लाज्मा सुद्धा त्यांच्यातर्फे उपलब्ध करुन देणे सुरू आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा सगळीकडे होत असतांना व ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यु होत असतांना ही गंभीर बाब लक्षात घेता येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी डॅा विवेक शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिंदे मंगल कार्यालयातील कोविड सेंटरवर रुग्णांना ॲाक्सीजनची गरज बघता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सुध्दा सीडीसीसी बैँकेचे संचालक रविंद्र शिंदे व त्यांच्या परिवाराकडुन पुरविण्यात आली आहे. सदर मशीन डॅा. मनीष सिंग वैद्यकीय अधिकारी ग्राणीत रुग्णालय भद्रावती यांचेकडे सुपूर्द केल्या या मशीन प्रती मिनिटाला ७ लिटर ॲाक्सीजन निर्मिती करतात त्यामुळे गंभीर रुग्णांवर येथे यशस्वी उपचार सुरू झाले आहे. शिंदे परिवाराने आपल्या मनाचा दिलदारपणा दाखवत आपले सभागृह, कॅालेज व सभागृह परिसरांत १५०० बेड ची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली आहे. कुठलाही राजकीय स्वार्थ नसतांना शिंदे परिवाराने दाखवलेल्या या कोरोना संकट काळातील निःस्वार्थी सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here