Home चंद्रपूर पोलीस पंचनामा :- चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत रोशन व मोनू ची...

पोलीस पंचनामा :- चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत रोशन व मोनू ची खुलेआमअवैध दारू विक्री ?

 

ठाणेदारांना अंधारात ठेऊन डी.बी पथकांची अवैध दारू विक्रेत्यांना परवानगी?

पोलीस पंचनामा :-

सद्ध्या जिल्ह्यात अधिकृत अवैध दारू व्यवसायिक थंड बसले असले तरी त्यांची जागा नव्या अवैध दारू विक्रेत्यांनी घेतली असल्याची चर्चा आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेली अधिकृत परवानगी असलेले अवैध दारू व्यवसायिक यांना पोलीस प्रशासनाने सद्ध्या कोरोना काळात परवानगी दिली नसल्याने इतर अवैध दारू विक्रेत्यांची गाडी जरा जोरात सुरू आहे अशातच शहर पोलीस स्टेशन अंतर्गत पठाणपूरा परिसरात व गेट च्या बाहेर रोशन व मोनू या दोघांनी अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना अंधारात ठेऊन डी बी पथकातील काही पोलीसांनी यांना खुलेआम अवैध दारू विक्रीची परवानगी दिली असल्याची चर्चा जोरात आहे.

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भिवापुर,गौतम नगर, महाकाली कॉलरी व लालपेठ कॉलरी परिसरात अवैध दारू विक्रीचे केंद्र बनले आहे ते सुद्धा छुप्या मार्गाने सुरू आहे पण आता पठाणपूरा गेट व परिसरात रोशन व मोनू च्या अवैध दारूचा धंदा जोरात सुरू असून डी बी पथकाची त्यांना परवानगी असल्याची चर्चा रंगत आहे आता पोलीस निरीक्षक यावर प्रतिबंध लावतात की यांची अवैध दारू विक्री अशीच सुरू राहणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleचंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात लागलेल्या आगीला जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करा.
Next articleखळबळजनक :- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here