Home वरोरा खांबाड्यात कोविड लसीकरण केंद्र दया, ग्रामपंचायतीची मागणी.

खांबाड्यात कोविड लसीकरण केंद्र दया, ग्रामपंचायतीची मागणी.

 

खांबाडा येथे वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती मागणी रास्त.

खांबाडा (मनोहर खिरटकर)

कोरोना चे संक्रमण आता शहरातून गावात शिरले असून स्थानीय खांबाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्ष्यात घेता या गावात कोरोना टेस्टिंग आणि लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच प्रकाश शेळकी व सामाजिक कार्यकर्ते पदमाकर कडुकर यांनी या क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना दिले आहे.

निवेदन देतांना सरपंच प्रकाश शेळकी, सामाजिक कार्यकर्ता पद्माकर कडुकर यांनी गावातील आणि परिसरातील वाढत्या कोरोना विषयक रुग्णांची गैरसोय होत असल्याबाबतची तक्रार केली. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या संदर्भात तातडीने पाठपूरावा करून लसीकरण केंद्र आणि तपासणी केंद्र सुरु करण्याची ग्वाही दिली.परंतु लोकप्रतिनिधी कोरोना च्या या संकट काळात जनतेसाठी आवश्यक आरोग्य सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याने जनतेत मोठा रोष असून खांबाडा या गावाला लवकरात लवकर कोविड लसीकरण केंद्र देण्यात यावे याबाबत गावातील नागरिक आग्रही आहे.

Previous articleखळबळजनक :- क्राईस्ट रुग्णालयातील डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना पोलीसांनी केली अटक.
Next articleपब्लिक पंचनामा :- लोकप्रतिनिधीनी जनतेच्या निधीतून कोरोनासाठी केलेल्या मदतीचा गाजावाजा करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here