Home चंद्रपूर पब्लिक पंचनामा :- लोकप्रतिनिधीनी जनतेच्या निधीतून कोरोनासाठी केलेल्या मदतीचा गाजावाजा करू नये.

पब्लिक पंचनामा :- लोकप्रतिनिधीनी जनतेच्या निधीतून कोरोनासाठी केलेल्या मदतीचा गाजावाजा करू नये.

 

जेष्ठ अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीयांना सुनावले खडे बोल, नीलेश लंके आणि रवींद्र शिंदे यांचा आदर्श घेण्याचा दिला सल्ला.

पब्लिक पंचनामा :-

सद्ध्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी हे कोरोना रुग्णांसाठी मदत दिल्याचा आव आणून वर्तमानपत्राद्वारे प्रशीद्धी मिरवीत आहेत, पण त्यांच्याकडून ज्या पद्धतीचे सहकार्य व मदत कोविड रुग्णांना हवी आहेत ती मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भात ज्येष्ठ अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते यांनी जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी यांना आवाहन केले आहेत की जर खरोखरंच कोरोना रुग्णांसाठी मदत करायची असेल तर पारनेर चे आमदार नीलेश लंके यांनी उभारलेल्या ११०० कोविड बेड सारखे रुग्णालय उभारा आणि जमलस तर भद्रावती येथे कोविड रुग्णांसाठी शिंदे परिवाराने ४०० बेडचे सूसज्य कोविड सेंटर उभारले तसे तरी किमान उभारा पण जनतेच्याच पैशातून कोविड रुग्णांना दिलेल्या मदतीची जाहिरातबाजी करू नका.

ज्येष्ठ अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते यांनी फेसबुक वर टाकलेल्या पोस्टवर ते पुढे म्हणतात की महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्था उत्तम असून त्या व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून चांगल्या प्रकारे त्यांचे कामे करीत आहे. त्याबाबत न्यायालयाने त्यांची तारीफ(प्रशंसा) सुद्धा केली आहे. वरील व्यवस्थेत ज्या संसाधनांची कमी आहे त्याची पूर्तता करण्याचा राज्यसरकार प्रयत्न करीत आहे. परुंतु काही लोकप्रनिधी निवळ प्रसिद्धीसाठी कारण नसताना त्या व्यवस्थेत ढवळाढवळ करीतअसून त्याची बातमी तयार करून ती त्यांचे फोटो सहित पेपर व सोशल मीडियावर टाकतात जर त्यांना खरच मदत करावयाची असेल तर त्यांनी भद्रावती येथील शिंदे परिवार व पारनेरचे आमदार नीलेश लंके प्रमाणे स्वतःचा पैसा खर्च करून कोविड सेंटर चालू करावे पण जनतेच्या निधीतून कोरोनासाठी केलेल्या मदतीचा गाजावाजा करून जनतेची दिशाभूल करू नये कारण कॊरोनामुळे सामान्य जनता संकटात आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ तथा अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते यांनी पहिल्यांदा जनतेच्या मनातील आवाज ओळखून ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत त्यावर कटाक्ष करून त्यांना खडे बोल सुनावले ते खरोखरंच आजच्या घडीला गरजेचे आहेत, कारण जर जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी यांनी ही जबाबदारी पार पाडून जनतेला त्रास होणार नाही याची दखल घेणे आवश्यक आहेत पण आपले लोकप्रतिनिधी सरकारच्या योजना आणि त्यांच्या संसाधनाने ज्या सुविधा कोविड रुग्णांना पूरविल्या जातं आहेत त्याच घटनेचे इवेंट्स करून स्वतःचे फोटो सह बातमी प्रसारमाध्यमाकडे प्रशीद्धीस देऊन स्वतःचा उदोउदो करतात ते त्यांना शोभणारे नाही पण बोलणार कोण? पण अशा परिस्थितीत अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते यांनी जे धाडस केल ते अत्यंत महत्वाचे असून निवडणुकीत मतदारांना कोंबडे बकरेची पार्टी देणारे व मतांसाठी पैसे वाटणारे लोकप्रतिनिधी आता मात्र स्वतःजवळून दमडीही खर्च करायला तयार नाही, त्यामुळे अशा लोकप्रतिनिधीनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार नीलेश लंके व भद्रावती येथील सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांचा आदर्श घेणे गरजेचे आहेत असे सूचक विधान फेसबुक च्या माध्यमातून पुरुषोत्तम सातपुते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here