Home चंद्रपूर सीडीसीसी बॅकेचे अध्यक्ष सतोषसिगं रावत यांनी कोरोना बाधितांसाठी केली ऑक्सिजन रुग्णवाहिकेची व्यवस्था

सीडीसीसी बॅकेचे अध्यक्ष सतोषसिगं रावत यांनी कोरोना बाधितांसाठी केली ऑक्सिजन रुग्णवाहिकेची व्यवस्था

 

कोरोना रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाइकांना अन्नपूर्णा थाळीची पण व्यवस्था.

मूल/चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांनी आपल्या स्वतःच्या मंगल कार्यालयात तब्बल चारशे बेड चे कोविड सेंटर उभारून ते प्रशासनाच्या स्वाधीन केले, एवढेच नव्हे तर तिथे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांच्या  जेवण्याची व्यवस्था सुद्धा केली त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी स्वतः काहीही न करता प्रशासनाकडे केवळ मागण्या आणि सल्ले देत आहे व त्याच्या सुद्धा बातम्या वर्तमान पत्रात देऊन प्रशीद्धी मिळवत असतांना रवींद्र शिंदे सारखेच कार्य सीडीसीसी बैँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोससिंग रावत यांनी सुद्धा कोविड रुग्णांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना आपल्या मूल तालुक्यात करून आपल्या लोकप्रतिनिधी असल्याची खरी भूमिका निभावली आहे.

सद्ध्या कोविड-१९ रोगाच्या प्रादुर्भाव काळात सीडीसीसी बैँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी दि.१५ एप्रिल पासुन दिवसरात्र रुग्नसेवा दिली असुन त्यांनी ४ ते ५ खाजगी वाहनात ॲाक्सीजनची व्यवस्था केली आहे.मुल मध्ये डॅाक्टराना रुग्णसेवा देण्याकरिता ॲाक्सीजन ची कमतरता भासु लागली होती. परंतु संतोषसिंग रावत यांनी ऑक्सिजन चक्क सिलेंडर सह खाजगी वाहनात ऑक्सिजन ची व्यवस्था तसेच २०० लोकाची जेवनाची व्यवस्था अन्नपूर्णा थाळीच्या माध्यमातून केली आहे.

संतोषसिंग रावत यांच्या माध्यमातुन अनेक लोकहितार्थ काम केल्या असून ते बॅकेचे अध्यक्ष झाल्यापासुन शेतकरी व शेतमजुर यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याचे निर्णय त्यांनी घेतले, त्यामुळे त्यांच्या या कामांची चर्चा ही संपूर्ण जिल्हयात होत आहे. कोरोना बाधित रुग्णांना बेड मिळुन देणे, वॅकसिनसाठी ॲानलाईन नंबर लावून देने. इत्यादी लोकापयोगी कामे करत आहे. त्यांचे सोबत त्यांचे सहकारी रॅाकेश रत्नावार माजी नगराध्यक्ष, घनश्याम येनुरकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुल संदीप कारमलयवार अखिल गागरेडीवार विनोद काबंळी नगरसेवक सुरेश फुलझले यांचे सुद्धा सहकार्य लाभत आहे.

Previous articleभद्रावती पोलीसांची दमदार कामगिरी देशी दारुसह ५ लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
Next articleदखल:- शिंदे परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी श्री मंगल कार्यालय कोविड सेंटरला दिली भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here