राशन बिल आणि केसरी कार्ड धारक ग्राहकांना राशन देत नसल्याची तक्रार.
वरोरा ता.प्र. :-
वरोरा तालुक्यातील बोरगाव (दे )येथील राशन दुकानदार बंडू कापकर हा राशन ग्राहकांना राशन धान्य याचे पैसे घेऊन सुद्धा त्याचे बिल देत नसल्याची तक्रार अनेक राशन ग्राहक करीत असतांना व या संदर्भात तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर सुद्धा कारवाई होत नसल्याने निर्ढावलेल्या स्वस्त धान्य दुकानदार यांनी राशन ग्राहकांची शुद्ध फसवणूक चालवलेली आहे.
या संदर्भात प्रहार चे कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बोरगाव येथील गावकरी यांच्या समस्या ऐकून घेतल्या व ते राशन दुकानात गेले आणि त्यांनी त्या राशन दुकानदार यांना विचारले कि तुम्ही बिल देता का, तर त्यांचे प्रती उत्तर मिळाले कि माझी मशीन बंद पडली आहे, कुणाला फोन मारायचा आहे तर मारा माझ कुणीच काही वाकडं करू शकत नाही असे बोलून तो वरोरा ला निघून गेला.
राशन दुकानदार बंडू कापकर यांचे तालुका पुरवठा अधिकारी यांच्यासोबत साटेलोटे असल्याने त्यांनी खुलेआम राशन ग्राहकांची आर्थिक लूट व फसवणूक चालवलेली असल्याने आता राशन दुकानदार यांच्या विरोधात जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन त्याचा परवाना रद्द करायला लावू अशी माहिती किशोर डुकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.