Home चंद्रपूर संतापजनक :- नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग.

संतापजनक :- नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग.

 

मुलीची चंद्रपूर च्या रामनगर पोलीसात तक्रार,गुन्हा दाखल.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कलियुगात नात्याचे महत्व राहिले नसून नीतीमूल्ये हरवलेली माणसे कुठल्याही स्थराला जावू शकतात याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात अशाच एका वडील व मुलीच्या नात्याला कलंक लावण्यात आलेला संतापजनक प्रकार समोर आला असून वयात आलेल्या मुलीवर घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आपले चारित्र्य सांभाळून घरून पळ काढला आणि पुढचा अनर्थ टळला. या मुलीने वडिलांविरोधात रामनगरच्या पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.

चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प परिसरातील एका कुटुंबात मुलगा, मुलगी असे दोन अपत्ये आहेत. दहावीनंतर मुलगी आईसोबत घरकाम करण्यासाठी जायची. मात्र, वडील कोणतेच काम करीत नाही. पण रिकामटेकडा बापाची वाईट नजर त्याच्या मुलीवर होती.

मागील वर्षीच्या लाकडाउन काळात एक दिवस घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने स्वतःला सांभाळत बापाला धक्का देत घराबाहेर पळ काढला व या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर वडिलाला घराबाहेर काढून देण्यात आले. तब्बल तीन महिन्यांनी आईला फोन करून अपघात झाल्याने घरी नेण्याची विनंती केली. यावेळी यापुढे तसा प्रकार होणार नसल्याचे सांगून माफी मागितली. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा वडिलांकडून त्रास देणे सुरु झाल्याने अखेर या प्रकाराला कंटाळून मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली असून वडिलावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. या घटनेने समाजात संताप व्यक्त होत असून नराधम बापाच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे.

Previous articleमूल तहसीलदार होळी यांच्या रेती घाट व रेती चोरी संदर्भातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करा.
Next articleशैक्षणिक :- शिक्षण फि वाढीच्या विरोधात पालकांमध्ये आक्रोश, पालकांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here