सुमनताई चांदेकर यांच्या नेत्रूत्वात हिंग्लाज भवानी परिसरात ठिय्या आंदोलन काल पासून सुरू पण प्रशासन बेखबर?
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर शहरातील हिँगलाज भवानी परिसरात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारे अधिकृत शाखा म्हणून श्री गुरुदेव महीला सेवा मंडळ ही नोंदणीकृत संस्था कार्यरत आहे. मात्र या गुरुदेव भक्त महिलांच्या प्रार्थना स्थळ व इतर वस्तूला कुलूप लावून बोगस गुरुदेव भक्त म्हणून समोर आलेले बाबूराव झुरमुरे, भाऊराव ढोके, बापूजी बोबडे, तुकाराम खारटकर, जर्नाधन क्षिरसागर इत्यादींनी कुलूप लावल्याने सुमनताई चांदेकर यांच्या नेत्रूत्वात हिंग्लाज भवानी परिसरात गुरुदेव महिला भक्तांचे ठिय्या आंदोलन कालपासून सुरू आहे.मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याचे चर्चेतून समोर आले आहे.
सुमनताई चांदेकर या महिलेने या परिसरात आपल्या अथक परिश्रमांने इथे प्रार्थना स्थळ व इतर भक्त निवास लोकवर्गणी व सीएसआर फंडातून बांधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार सुरू केला परंतु त्या महिलेलाच इथे बोगस गुरुदेव भक्त अश्लील शिवीगाळ करून बाहेर काढून संपूर्ण वस्तूला कुलूप ठोकले असल्याने महिला वर्गात मोठा असंतोष खदखदत आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे बोगस रजिस्ट्रेशन दाखवून व बोगस नाव वापरून जो अवैध कब्जा बोगस गुरुदेव भक्तांनी केला त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महिला गुरुदेव भक्तांनी केली त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान महिला प्रार्थना स्थळी गेल्यावर त्यांना त्या बोगस गुरुदेव भक्तांनी दादागिरी करून हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याने सुमन ताई चांदेकर या गुरुदेव भक्त महिलेच्या नेत्रूत्वात काल दिनांक २१ जुलै पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी संस्थेची चंद्रपूर शाखा म्हणून रजि.नं. २४७२ दिनांक १०/०४/१९८८ ला श्री गुरुदेव महिला सेवा मंडळ बाबूपेठ अशी नोंद केली होती व दिनांक ०५/०९/१९८९ ला स्थानिक धर्मदाय आयुक्त येथे नोंदणी क्रमांक महा. २७/८९ नुसार श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ बाबूपेठ ही संस्था नोंदणी केली. हिंगलाज भवानी बाबूपेठ येथे असलेल्या या संस्थेला मोठी जागा, प्रार्थना स्थळ, भक्त निवास आहे व यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, प्रचार करुन जनतेत जनजागृती करण्याचे कार्य सुमनताई चांदेकर मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. परंतु परिसरात ज्या लोकांना सेवाभावी लोक म्हणून वावरू दिलं तेच लोक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराच्या विरोधात चक्क त्या परिसरात बोगस संस्था व बोगस रजिस्ट्रेशन क्रमांक दाखवून कब्जा केलेला आहे शिवाय स्वताचे किरायेदार सुद्धा भक्त निवास मधे ठेऊन स्वतःची दुकानदारी सुरू केली आहे.त्यामुळे आता आरपार ची लढाई लढण्यासाठी सुमनताई चांदेकर यांच्या नेत्रूत्वात ठिय्या आंदोलन सुरू असून बोगस गुरुदेव भक्त मात्र इथून गायब असल्याची माहिती आहे.आता जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.