Home महाराष्ट्र मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांकडून अटक

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांकडून अटक

 

दहीहंडी होणार म्हणजे होणार मनसेचा ठाम निर्णय.

मुंबई महाराष्ट्र न्यूज :-

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवावर बंधन घालण्यात आली आहे. मात्र, मनसे पक्षातर्फे हिंदू सणावरच बंदी का? हा प्रश्न उपस्थित करून राज्यात जागोजागी दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित केल्या जात आहे, दरम्यान ठाणे शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या निर्णयावर मनसे ठाम आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कडून ठाण्यातील भगवती मैदानात उपोषण करण्यात आलं होतं. यावेळी ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ठाणे येथील काल सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेनं दहीहंडी उत्सवासाठी तयारी सुरू केली होती. या मैदानात स्टेज उभारण्यात येत होता. मात्र पोलिसांनी सव्वा अकराच्या सुमारास अविनाश जाधव यांच्यासहीत पदधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, मनसे दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात ठाम असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याची घोषणा मनसेनं केली आहे.

अविनाश जाधव यांची सरकारची टीका

दरम्यान, पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. नारायण राणे कुडाळमध्ये पोहोचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे- दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचे कारण दिलं जातं. याचं राजकारण करताना करोना आडवा येत नाही, असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.

सायंकाळी घडलेल्या घडामोडी.

मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका जाधवांवर ठेवण्यात आला आहे. अविनाश जाधवांसह काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवलं आणि नेवाळी पोलीस चौकीत आणलं. यावेळी अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleलक्षवेधी:- अन्ना हजारे यांचे डोके ठिकाणावर आहे का?
Next articleमनसेच्या ऐतेहासिक दहीहंडी कार्यक्रमांने वरोरा शहर दूमदूमले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here