Home भद्रावती अत्यंत चिंताजनक :- एका सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून दोन तास केला...

अत्यंत चिंताजनक :- एका सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून दोन तास केला अत्याचार.

 

महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना, पोलीसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या.

नाशिक न्यूज नेटवर्क :-

देशात बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दररोज कुठे ना कुठे या घटना प्रसारमाध्यमामधे आपली उपस्थिती दाखवतात त्यामूळे शरीएत सारखे कायदे काढून अत्याचार करणाऱ्यांना सरळ भर चौकात गोळ्या झाडून ठार करण्याचा कायदा आणायचा का? यावर सुद्धा विचारमंथन होत आहेत. अशीच एक घटना नाशिक शहरात घडली असून ही घटना महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ठरली आहे. मुंबईतील साकीनाका येथील घटना ताजी असताना, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे. यानंतर आता नाशिक शहरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथील एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, अवघ्या काही तासांत पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.

संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. तर पीडित महिला विधवा असून तिचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला. यानंतर त्याने पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर 2 तास अत्याचार केला आहे.

ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला. यानंतर त्याने पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर 2 तास अत्याचार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here