10 रुग्णांचा जळून मृत्यू झाल्याने उडाली खळबळ. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश,सर्वत्र हाहाकार.
न्यूज नेटवर्क :-
आज दिनांक 6 नवेंबर ला सकाळी साडेदहाच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या कक्षाला भीषण आग लागून १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून या अतिदक्षता कक्षात साधारण: २० ते २५ रुग्ण उपचार घेत होते.
ही भीषण आग लागल्याने रुग्णालय परिसरात परिस्थिती तनावपूर्ण झाली मात्र काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या अतिदक्षता विभागात धाव घेतली. दरम्यान रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून संपूर्ण अतिदक्षता कक्ष जळून खाक झाले आहे. या भीषण अग्रितांडवात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व रुग्ण वयोवृद्ध आणि व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्यानंतर त्यांना शिफ्ट करत असताना त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले, कॅम्प पोलीस स्टेशनचे शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल आहेत. आता या आगीचे नेमके काय कारण हे तपासात समोर येईल पण आपल्या शेवटच्या मोजत असलेले रुग्ण मारण्याआधीच जिवंत जाळल्या गेले हे सर्वात जास्त दुःखद बाब आहे.