Home Breaking News सुमित्रनगर वासीयांसमोर मनपा प्रशासन नमले पुढील 3 दिवसांत मिळणार अमृतचे पाणी

सुमित्रनगर वासीयांसमोर मनपा प्रशासन नमले पुढील 3 दिवसांत मिळणार अमृतचे पाणी

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

600 आंदोलकांनी केला ताडोबा रस्ता जाम

चंद्रपूर  :-  महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात सुमित्रनगरवासीयांनी मोर्चा उघडल्या नंतर बुधवारी 15 मे ला वस्ती समोरच माजी नगरसेवक इंजि सुभाष कासंगोट्टुवार यांच्या नेतृत्वात ‘अमृत नळ योजनेचे पाणी मिळावे’ म्हणून सकाळी 11 वाजता ताडोबा रोड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला यश आले असून सुमित्रनगरवासीयांना आता पुढील 3 दिवसात अमृत योजनेच्या पाण्याचा पूरवठा केला जाणार आहे.तब्बल 2 तास चाललेल्या आंदोलनात 600 नागरिकांनी सहभाग घेतला.

यात प्रमुख्याने माजी नगरसेवक इंजि सुभाष कासनगोट्टूवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञाताई गंधेवार, पुर्शोत्तम सहारे ,अमीन शेख ,शिला चव्हाण,वसंतराव धंदरे पाटील, विजय चिताडे, मायाताई ऊईके,आशिष ताजने,रंजीत मातंगी,आशिष बोंडे, अभिषेक सिंग, ललीता बावनथडे,राजेश वहाडे ,नरेश वानखेडे , भास्कर इसंकर , पंधरे काका,दिपा नागरिकर,पुरुषोत्तम राऊत, कैलास सुरसाऊत ,देशमुख मॅडम ,सुरेखताई बोंडे ,जसूबाई ,

,प्रीया कुरेकर , वंदना पाटील , नेहा चोखांद्रे, प्रतीभा भुसारी , अंकिता चौरासिया भागडे ताई, विशेष गिरी, मंजुषा चिकटे, निशा मानकर, शांताबाई जाधव, कमलाबाई सुरसाऊत ,अनिता बैस, आशाबाई, चिमणकर, आशाबाई मानकर, मायाबाई पारखी, दिव्या निलमवार, भारती भिसेन, साबिरा शेख, गुलजार शेख, रहीम शेख, भरतलाल सारसाऊत ,विकी रामटेके यांचा समावेश होता.

 

                 म्हणून नागरिक झाले संतप्त

3 एप्रिल2021 ला उद्घाटीत अमृत पाणी पुरवठा लाईन सुमीत्र नगर वस्तीला न जोडल्या मुळे नागरिक संतप्त झाले आहे.वारंवार निवेदन देऊनही अमृत योजनेचे पाणी पोहोचले नाही म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली.मनपाने 40 वर्षांपासून राष्ट्रवादी नगर व द्वारका नगरी येथे राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्याचे नोटीस दिल्यामुळे येथील नागरिक संतापले आणि त्यांनी पण आंदोलनात सहभाग नोंदविला.

         मनपाचे आश्वासन व पोलसांची अटक कारवाई

बुधवारी सुमित्रनगरच्या समोर आंदोलन स. ११ वाजता सुरू झाले.बघता बघता शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले याची धास्ती घेत. महानगर पालीकेचे उपविभागीय अभीयंता विजय बोरीकर यांनीं आंदोलकांची भेट घेत तीन दिवसात सुमीत्र नगर वस्तीचे अमृत पाणी पुरवठा चालु करू असे लेखी आश्वासन दिले. तसेच राष्ट्रवादि नगर व व्दारकानगरी येथील पुर वस्तीत पावसाळयात घरे खाली करावे असे नोटिस दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली व नाला सफाई करण 3 दिवसात सुरू करू असे आश्वाासीत केले.आंदोलनात सहभागी लोकांची अटक करून सुटका करण्यात आली.

         पाणी नाही मिळाले तर मनपाला कुलूप ठोकू

आंदोलनाची धास्ती घेत मनपाने 3 दिवसात पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन देत आंदोलन स्थगित करायला लावले.आश्वासन पूर्ण नाही झाले तर मनपाला कुलूप ठोकून आमरण उपोषण करू असा धमकीवजा इशारा माजी महामंत्री भाजपा तथा माजी नगरसेवक इंजि.सुभाष कासंगोट्टुवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here