मनसेच्या जनसंपर्क कार्यालयातील हालचालीवर का ठेवला जातोय डोळा. कुणाची वाकडी नजर?
भद्रावती :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात मनसेची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठी तयारी सूरू असताना काही पक्षातील लोकांना हाताशी पकडून राजू कुकडे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी विरोधकांकडून वेगळेच आयात उमेदवार समोर केले जात आहे, दरम्यान आता आचारसंहितेच्या नावाखाली नगरापरिषदच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सर्वात अगोदर “राजगड” या मनसे जनसंपर्क कार्यालयासमोरील जनता दरबार चे लावलेले बैनर फ्रेम सह नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काढून नेल्याचा संतापजनक प्रकार काल आचारसहिंता लागताच समोर आल्याने मनसे कार्यकर्त्यात संताप व्यक्त होत आहे. इतर राजकीय पक्षाचे मोठामोठे होर्डिंग काढले नसताना केवळ सर्वात अगोदर मनसेच्या कार्यालयाला कां टारगेट केल्या जात आहे हा राजकीय एजंडा तर नाही ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा आणि भद्रावती या दोन शहरांत “राजगड” या नावाने दोन जनसंपर्क कार्यालये आहेत. इथे जनसामान्य जनतेचे प्रश्न राजू कुकडे यांच्या कडे जनता दरबार मध्ये मांडले जातात व ते प्रश्न शासन प्रशासन स्तरावर सोडवले जातात, दरम्यान यामुळे हजारो लोकांना या कार्यालयातून न्याय मिळाला असल्याने ही कार्यालये जनतेसाठी न्यायालय बनली आहे, मात्र विरोधी पक्षातील नेत्यांना व पक्षांतर्गत विरोधकांना हे पचणी पडत नसल्याने ते काहींना काही खोड्या करत असतात मात्र आचारसहिंतेत सर्वात प्रथम मनसेच्या कार्यालयातील बैनर काढणे आणि दुसऱ्या पक्षाच्या बैनरला दुसऱ्या दिवशी काढणे हा आदर्श आचारसहिंतेचा भंग नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनसेची वाढलेली ताकत व विधानसभा क्षेत्रात मनसेकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात जुळल्याने विरोधी पक्षातील उमेदवारांचे धाबे दाणाणले असल्याने त्यांच्या माध्यमातून हा प्रकार केला गेला असावा अशी शंका निर्माण होत आहे. दरम्यान मनसेच्या वरोरा आणि भद्रावती या दोनही कार्यालयातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हालचालीवर कुणाचा तरी डोळा लागला असल्याचे दिसत आहे त्यामुळे या कडे कुणाची वाकडी नजर आहे? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.