Home भद्रावती संतापजनक :- विष प्राशन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांचा मृतदेह अजूनही जिल्हा रुग्णालयातच?

संतापजनक :- विष प्राशन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांचा मृतदेह अजूनही जिल्हा रुग्णालयातच?

अनिल धानोरकर यांच्या नावाने बेकायदेशीर असलेला सातबारा मृत शेतकऱ्यांच्या वारसांच्या नावे करण्यास प्रशासनास अजूनही नकार,

चंद्रपूर /भद्रावती :-

भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता व शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन सुद्धा जमिनीचे फेरफार न केल्याने अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांनी यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन केले होते, दरम्यान मेश्राम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती, अशातच मृत्युंशी झुंज देत अखेर 10 दिवसांनतर परमेश्वर विश्वनाथ मेश्राम यांची काल पहाटे 3:00 वाजता प्राणज्योत मालवली, या घटनेने मेश्राम परिवारावर मोठं दुःख आणि संकट कोसळलं असून मेश्राम यांच्या मृत्यूला जबाबदार तहसीलदार भंडारकार, नायब तहसीलदार खांडरे व शेतकऱ्यांची शेतजमीन हडपणारे भद्रावती नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकांच्या कुटुंबियांचे नावे तात्काळ सातबारा करा व नुकसान भरपाई द्या अन्यथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन केलेले मृतक परमेश्वर मेश्राम चे प्रेत उचलणार नाही अशी भूमिका मृतक परिवाराने घेतल्याने जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन हतबल झाले व शव शीतगृहात ठेवण्यात आले. दरम्यान उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी काल मृतक शेतकरी मेश्राम यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची मनधरणी केली की आपण मृतदेहावर अंत्यसंस्कार करा पण मेश्राम कुटुंब सातबारा आमच्या नावाने झाल्याशिवाय आम्ही प्रेत घरी आणणार नाही अशी ठाम भूमिका घेतली, मात्र साडेपाच एकर शेत जें अनिल धानोरकर यांच्या नावे आहे त्या शेताची केस मेश्राम परिवाराने जिंकली खरी पण धानोरकार हें उच्च न्यायालयात अपील मध्ये गेले असल्याची सबब पुढे करून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी त्या शेताचा सातबारा मेश्राम कुटुंबियांच्या नावे करण्यास नकार दिल्याने हें प्रकरण पुन्हा चिघळणार अशी दाट शक्यता आहे..

मृतक परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांची कुरोडा येथील सर्वे नंबर 86, 87, 95, 98 ची एकूण 9 एकर जमीन आहे, त्या जमिनीपैकी साडेपाच एकर जमीन धानोरकर यांना विकली खरी पण शेतकरी मेश्राम यांना जमिनीचा मोबदलाच मिळाला नाही, जें एक एक लाखाचे चेक मेश्राम यांच्या नावे दिले होते ते चेक सुद्धा बॉन्स झाले त्यामुळे परमेश्वर मेश्राम यांनी भद्रावती येथे दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केलं होतं तेंव्हा न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला त्यानंतर धानोरकर हें जिल्हा सत्र न्यायालयात गेले तिथे सुद्धा धानोरकर हरले त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाची ऑर्डर कॉपी घेऊन परमेश्वर मेश्राम हें सतत भद्रावती तहसीलदार यांच्याकडे सातबारा फेरफार करण्याची विनंती करतं होते, ते मानत नव्हते म्हणून जवळपास 1 लाख 50 हजार रुपये फेरफार करण्यासाठी तहसीलदार राजेश भंडारकार यांना दिले पण धानोरकर परिवाराचा राजकीय दबाव असल्याने तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी या प्रकरणाची दखल नं घेता शेतकरी मेश्राम यांच्या नावे सातबारा केला नाही त्यामुळे अखेर त्यांनी भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आणि दहा दिवसानंतर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या या मृत्यूला तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह भाजप चे नेते तथा माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर दोषी आहे त्यामुळे या सर्वावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, आमच्या नावाने सातबारा करा आणि त्या शेतजमिनीचा कब्जा आम्हांला द्या अन्यथा आम्ही प्रेत उचलणार नाही ही तटस्थ भूमिका मृतक परमेश्वर मेश्राम यांची पत्नी मुलगा आणि मुलीने घेतल्याने मृतक परमेश्वर मेश्राम चे प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच पडून आहे, पण प्रशासन मेश्राम परिवाराला न्याय देऊ शकतं नाही ही चिंताजनक बाब कुण्या लोकप्रतिनिधी यांच्या कानावर जाऊ नये ही त्याहीपेक्षा मोठी शोकांतिका आहे, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बच्चू कडू यांची प्रहार त्या मेश्राम परिवाराच्या पाठीशी उभी आहे, यामध्ये पुढे काय होईल हें पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे..

धानोरकर परिवाराने असं फसवलं गरीब शेतकरी मेश्राम ला

शेतजमिनीचा सौदा मेश्राम सोबत झाल्यानंतर रजिस्ट्री वेळी खरं तर पूर्ण पैसे मेश्राम ला द्यायला हवे होते, पण माणुसकी हरवलेले व केवळ संपत्ती जमा करण्याचा नाद असलेले धानोरकर यांनी दि युनिडेट वेस्टर्न बैंक मधील पंचवटी बार अँड रेस्टॉरंट चे दिनांक 4/8/2006, 25/8/2006 व 22/9/2006 चे 1-1 लाखाचे तीन चेक दिले होते ते मेश्राम यांनी बैंकेत वठवल्या नंतर बॉन्स झाले, त्यानंतर त्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि दोन न्यायालयात ते जिंकले पण न्याय मिळाला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला आत्महत्त्या करावी लागली, धानोरकर परिवाराने अशा किती शेतकरी लोकांच्या जमिनी हडपल्या असेल याबाबत शंका आहेच आणि कित्तेक शेतकरी आता समोर यायला लागले आहे, ज्यांच्या भरोशावर निवडनुका जिंकतो त्या शेतकऱ्यांच्या जमिनी जर लोकप्रतिनिधी हडपत असेल आणि त्यासाठी शेतकऱ्यांना आत्महत्त्या करावी लागतं असेल तर मग देशात लोकशाही जिवंत आहे कां असा प्रश्न पडतो पण मेश्राम कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मनसे आणि प्रहार लढणार एवढं मात्र नक्की..