Home भद्रावती ब्रेकिंग :- तडीपार ची कारवाई प्रस्तावित असतांना भद्रावती कृ. ऊ. बा, समितीचे...

ब्रेकिंग :- तडीपार ची कारवाई प्रस्तावित असतांना भद्रावती कृ. ऊ. बा, समितीचे माजी सभापतीवर पुन्हा गुन्हे दाखल..

रात्रीच्या वेळी वासुदेव ठाकरे यांचेवर रेती घाटावर जाऊन मजुरांना धमकावून अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, तडीपार ची कारवाई होण्याची शक्यता?

भद्रावती:-

भद्रावती बाजार समितीचे माजी सभापती ज्यांनी नुकतेच सिडीसीसी बैंकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे सोबत भाजप पक्षात प्रवेश केला ते वासुदेव ठाकरे यांचेवर काल भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये कलम 296, 329(3), 351(2) अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून आता त्यांचेवर तडीपारची कारवाई निश्चित होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे,

काही महिन्यापूर्वी निप्पान अँड डेंड्रो कंपनी च्या जागेवर उद्योग उभारला जात असतांना कंपनी च्या लोकांना मारहान केल्या प्रकरणी वासुदेव ठाकरे यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते या संदर्भात केस क्रमांक 08/2025 अन्वये त्यांना हद्दपार करण्याची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक यांचे स्तरावर प्रस्तावित होती व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्याकडे चौकशी करिता प्रलंबित आहे. दरम्यान वासुदेव ठाकरे यांचा रेतीचा व्यवसाय होता परंतु यावेळी त्यांना कुठंलाही रेती घाट लिलावात मिळाला नसल्याने त्यांना यावेळी केवळ बघ्याची भूमिका निभवावी लागतं असल्यामुळे ते आता रेती घाट धारकांविरोधात आक्रमक होतं आहे,

काय आहे प्रकरण?

पोलीस स्टेशन भद्रावती येथे काल दिनांक 10 सप्टेंबर रोजी अंकुश हरिदास झाडे यांनी तोंडी रिपोर्ट देऊन म्हटले की मी मजुरीचे काम करतो. गितेश सातपुते रा. भद्रावती यांनी शासनाचे परवानगीने रेती घाट लिलावमध्ये मौजा पिपरी (देशमुख) शिवारातील वर्धा नदीचा रेती घाट 2 वर्षाकरीता घेतला असुन रेती घाटावर आमचे गाड्याचे मेंटनंन्स करीता पत्राचा शेड बांधलेला आहे. त्या ठिकाणी मी व माझे सोबत ईतर कामगार राहत असतो. दरम्यान दिनांक 9 सप्टेंबर ला रात्री गौरव संजय पावडे, आकाश आमटे, प्रकाश निखाडे, अमोल जिवतोडे, आशुतोष घाटे असे कामं करणारे व्यक्ती आपल्या शेड मध्ये असतांना वासुदेव ठाकरे हे तिथे लाल रंगाची थार गाडीने तीन व्यक्ती सोबत आले व वासुदेव ठाकरे याने गितेश सातपुते व शुभम चांभारे हे कुठे आहेत साले मादरचोद शुभम चाभारे त्याचे मायची पुदी साल्यांना आज सोडत नाही मी पिंपरी चौंकात रात्रभर थांबुन राहतो त्यांना बोलव तुमच्या बापाचा रस्ता आहे काय असे अश्लील शब्दात शिवीगाळ करुन धमकी दिली असल्याची तक्रार दिली, त्यांच्या तक्रारी वरून वासुदेव ठाकरे यांचेवर भद्रावती पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हे दाखल झाले आहे.

ठाकरे यांची तडीपार होण्याची शक्यता बळावली?

वासुदेव ठाकरे हे भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून त्यांनी नुकताच भाजप मध्ये सिडीसीसी बैंकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचेसोबत प्रवेश केला होता, सत्ताधारी पक्षात असल्यामुळे आता आपल्यावर कारवाई होणार नाही या तोऱ्यात असणाऱ्या वासुदेव ठाकरे यांनी आपल्या राजकीय दबावाच्या करामती सुरू केल्या परंतु कायदा सर्वांसाठी सारखा असतो याचे कदाचित त्यांनी भान ठेवले नाही आणि रात्रीच्या वेळी नदी घाटावर जाऊन कामगारांना त्यांनी धमकावले ही अत्यंत चुकीची बाब असल्यामुळे त्यांचेवर गुन्हे दाखल झाले आहे, मात्र अगोदरचं पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे पत्र क. स्थागुशा/एमओबी/हद्दपार प्रस्ताव/2025/569 दिनांक 21/2/2025 नुसार पोलीस स्टेशन अधिकारी, भद्रावती यांचे प्रस्ताव क. 1/2025 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) नुसार वासुदेव उर्फ वासु हनुमान ठाकरे, रा. चिरादेवी ता. भद्रावती जि. चंद्रपूर यांचा हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागाच्या हातात असून तो उपविभागीय अधिकारी वरोरा यांचेकडे जाऊन त्यावर लवकरच तडीपार करण्याची कारवाई होईल अशी माहिती होती आता त्यात पुन्हा गुन्ह्यांची भर पडली असल्यामुळे त्यांना तात्काळ तडीपार व्हावं लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here