Home चंद्रपूर क्राईम :- पडोली पोलीस स्टेशन ठाणेदारांचे अवैध धंद्याना संरक्षण आले प्रकाशात?

क्राईम :- पडोली पोलीस स्टेशन ठाणेदारांचे अवैध धंद्याना संरक्षण आले प्रकाशात?

बातमी पोलिसांच्या संदर्भात आणि तो माझाच धंदा आहे म्हणून पत्रकारांना फोन करतोय अवैध व्यवसायी?

चंद्रपूर :-

खरं तर पोलीस हे जनतेच्या सरक्षणासाठी असतात आणि कुणावर अन्याय होऊ नये कुणावर अत्त्याचार होऊ नये, शांतता प्रस्थापित होऊन भ्रष्टाचामुक्त प्रशासन निर्माण व्हावं यासाठी पोलिसांना कर्तव्यास ठेवण्यात आलं आहे, परंतु ज्या प्रमाणे कुंपणच शेत खाणार असेल तर शेताला वाचविणार कोण? अशीच परिस्थिती सद्या पोलीस विभागाची झाली असून अवैध धंद्याना पोलिसच संरक्षण देत असेल तर मग अवैध धंद्यावर अंकुश कोण लावणार? हा मोठा गंभीर प्रश्न आहे, खरं तर पोलिसांच्या ब्रीद वाक्यात “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”‘ हे जें ब्रीद वाक्य आहे ते ब्रीदवाक्य श्रीमद् भागवत पुराण , स्कन्ध दहावा, अध्याय सत्तरावा, श्लोक २७ वा यातील चार पैकी दुसरी ओळ आहे.
“लोके भवाञ्जगदिनः कलयावतीर्णः
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय चान्यः ।
कश्चित् त्वदीयमतियाति निदेशमीश
किं वा जनः स्वकृतमृच्छति तन्न विद्मः

अर्थात “जगदीश्वरा ! आपण जगामध्ये सर्वसामान्य जनतेचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी या लोकी अंश रूपाने अवतरला आहात. असे असता हे प्रभो ! एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हांला दु:ख देतो, की आमचीच कर्मे आम्हांला दु:ख देत आहेत, हे आम्हांला कळत नाही.

पडोली पोलीस वरील ब्रीद वाक्याचा अर्थ समजत नाही किंव्हा त्यांना तो समजायचा नाही, पण आपण न्यायालयात भगवतगीतेची शपथ घेतो कारण त्या भगवतगीतेत “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे दोन शब्द समाविष्ठ केलेले आहेत ते बहुतांश लोकांना माहीत नाही. मागील भूमिपुत्राची हाक या अंकात “पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत चाललाय झेंडीमुंडीचा जुगार, डिझेल चा गोरखधंदा. ” या मथाळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती, त्या बातमीत नमूद नसणाऱ्या एका अवैध व्यवसायी याचा संपादक यांना फोन आला की भाऊ, यार कशाला बातमी टाकली तो धंदा माझा आहे, पण माझे तिथे नाव नाही, भाऊ तुम्हांला मी भेटतो…….

जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत जर एखादा अवैध व्यवसायी छाती ठोकून सांगत असेल की तो माझा धंदा आहे तर मग या पोलीस स्टेशनं चे ठाणेदार यांना हे माहित नाही कां? बरं जर एखाद्या वर्तमान पत्रात बातमी प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी खरं तर याची दखल घेऊन त्या धंद्यावर अंकुश लावायला हवा, पण असं काहीही न करता चक्क अवैध व्यवसायी पोलिसांच्या भूमिकेत आपलचं कामं आहे म्हणतात, याचा अर्थ पोलिसांनी या अवैध व्यवसायी यांना किती मोठं सुरक्षा कवच दिलं असावं हे स्पष्ट होतं आणि म्हणून या पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी आणि झेंडीमुंडीचा जुगार जोमात आहे, यावर वेळीच अंकुश लावल्या गेला नाही तर उद्याला हेच अवैध व्यवसायी पोलिसांच्या नोकरीवर उठेल एवढ लक्षात ठेवावं, दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here