Home भद्रावती धक्कादायक :- भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांनी अखेर सोडले...

धक्कादायक :- भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांनी अखेर सोडले प्राण.

निलंबित तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची परिवाराची मागणी..
भद्रावती तहसीलदार भंडारकार नंतर वरोरा तहसीलदार कौटकर यांच्यावर पण अशीच वेळ येण्याची शक्यता.

चंद्रपूर /भद्रावती :-

भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता व शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन सुद्धा जमिनीचे फेरफार न केल्याने अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांनी यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन केले होते, दरम्यान मेश्राम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती, अशातच मृत्युंशी झुंज देत अखेर 10 दिवसांनतर परमेश्वर विश्वनाथ मेश्राम यांची आज पहाटे 3:00 वाजता प्राणज्योत मालवली, या घटनेने मेश्राम परिवारावर मोठं दुःख आणि संकट कोसळलं असून मेश्राम यांच्या मृत्यूला जबाबदार तहसीलदार भंडारकार व नायब तहसीलदार खांडरे यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे..

मृतक अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांनी कुरोडा येथील सर्वे नंबर 86, 87, 95, 98 मधील शेतजमिनीवर 2015 च्या न्यायालयीन आदेशानुसार वारसांची नावे अभिलेखात नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी न करता प्रकरणात “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे नमूद करून अर्ज निकाली काढला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या परमेश्वर मेश्राम यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात विषप्राशन केले. सध्या ते रुग्णालयात उपचाराधीन असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाने महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम 1969 च्या उल्लंघनाबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.

तहसीलदार भांडारकर यांच्या कार्यकाळात अनेक वाद निर्माण झाले. अवैध रेती व मुरूम उत्खनन प्रकरणे, कार्यालयात गैरहजेरी, शेतकऱ्यांच्या लोकअदालतीत अनुपस्थिती, तक्रारी प्रलंबित ठेवणे आणि ग्रामस्थांच्या समस्या न सोडविणे अशा अनेक आरोपांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. दरम्यान शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे अनेक तक्रारी दिल्या होत्या, मात्र भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता जाणीवपूर्वक कर्तव्यात कसुरी केल्यामुळे शेतकऱ्यांनी भद्रावती तहसील कार्यलयात विष प्राशन करून स्वतःचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणी तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी जारी केल्याने एकच खळबळ उडाली होती,

भद्रावती तहसीलदार भंडारकार यांच्या सारखीच वरोरा तहसीलदार कौटकर यांची भ्रष्ट भूमिका?

तहसीलदार यांनी जनतेच्या सेवेचे काम सोडून पैसे कमाविण्याचे सूत्र वापरून ज्या जनतेसाठी ते नियुक्त आहे त्यांचे काम करण्यापेक्षा त्यांचे आर्थिक शोषण ते करतं असून भद्रावती तहसीलदार भंडारकार ह्या भ्रष्ट तहसीलदार यांनी एका शेतकऱ्यांचा जीव घेतला तशीच परिस्थिती वरोरा तहसीलदार योगेश कौटकर यांनी अनेक शेतकऱ्यांची केल्याचे अनेक उदाहरणे असूनमं डळ अधिकारी श्रीरामवार यांना हाताशी घेऊन कित्तेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे न्यायप्रविष्ठ प्रकरणात सावकारांच्या नावे करण्यात यांचा हात आहे, तर दुसरीकडे अवैध उत्खनन करणाऱ्यांना संरक्षण देऊन शासनाचा कोट्यावधीचा महसूल त्यांनी बुडवीला असल्याचे अनेक उदाहरणे आहे त्यामुळे त्यांचे निलंबन सुद्धा काही दिवसातच होईल अशी चर्चा रंगत आहे.