Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट:- चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस विभागात “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद धोक्यात?

क्राईम ब्लास्ट:- चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस विभागात “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद धोक्यात?

दुर्गापूर, पडोली व घुग्गुस पोलिस ठाणेदारांनी आपल्याच कर्तव्याला फासलं काळं? पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील दखल घेणार?

चंद्रपूर:-

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागात “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” धोक्यात आलं की काय असा प्रश्न निर्माण होत आहे, कारण राजकीय आश्रय आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे गुंडगिरी आणि अवैध व्यवसायांमध्ये मोठी वाढ झाली असून एका पोलीस उपनिरीक्षक यांना गर्दीत अवैध व्यवसायिकांकडून मारहान होते, पण पोलीस विभागात त्याबाबत गुन्हा दाखल होत नाही ही अतिशय गंभीर बाब असतांना वरिष्ठ पोलीस अधिकारी गप्प कां? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पूर्व विदर्भाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी नुकताच चंद्रपूर दौरा केला होता, त्या दौऱ्या दरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची वागणूक आणि अवैध धंदेवाईक यांना संरक्षण देत पत्रकारावर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणी कानउघडणी केली होती, मात्र पडोली सारख्या औद्योगिक क्षेत्रातील पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक पोस्ट असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांना पदभार कां दिला? हा प्रश्न उपस्थित होत आहे, पोलीस मुख्यालयात सक्षम पोलीस अधिकारी असताना ज्याला पत्रकारावर बातमीच्या माध्यमातून गुन्हा दाखल करता येत नाही, याचं ज्ञान नसलेले योगेश हिवसे यांना तब्बल एक वर्षापेक्षा जास्त काळापासून पोलीस निरीक्षक पदाच्या खुर्चीवर कुठल्या नियमानाने बसवले गेले याचं उत्तर कोण देणारं हा प्रश्न आहे.

तीन पोलीस स्टेशन आयजी च्या रडारवर?

जिल्ह्याच्या दुर्गापूर पडोली व घुग्गुस परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असतांना तेथील ठाणेदार मात्र त्याला खतपाणी घालून पुन्हा परिस्थिती धोक्यात आणत आहेत, दरम्यान पत्रकारांनी याबाबत वस्तुस्थिती बातमीतून मांडली तर आपल्या अधिकार क्षेत्रात नसलेले गुन्हे दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी ठाणेदारांकडून करण्यात येते, जिल्ह्यात कोळसा, वाळू, गुटखा, मद्य आणि अंमली पदार्थ यांसारख्या अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे, त्यात जुगार, सट्टापट्टी, झेंडीमुंडी सह ऑनलाइन सट्टेबाजीचा प्रकारही वाढत आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय व त्यातून गुंडगिरी वाढण्यामागे राजकीय पाठिंबा हे एक महत्त्वाचे कारण आहे. यासोबतच, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेही अनेक अवैध धंदे जोमात सुरू आहेत, या परिस्थितीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अवैध व्यवसायांना खतपाणी मिळत आहे, पण वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत मौन बाळगून कां आहे? का त्यांच्या आदेशाने ह्या सर्व धंद्याना पाठबळ मिळताहेत? या प्रश्नाला घेऊन जोरदार चर्चा आहे. त्यात पडोली मधील झेंडीमुंडी, अवैध डिझेल विक्री व चोरी, दुर्गापूर मध्ये वादग्रस्त ठाणेदार संदीप एकाडे यांच्या परिसरात सट्टापट्टी सह विविध अवैध व्यवसाय तर घुग्गुस मध्ये डिझेल चोरांकडून पैसे घेऊन अवैध डिझेल ची गाडी सोडल्याच्या तक्रारी ज्या प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित झाल्या तरी ठाणेदारावर कारवाई कां नाही? याचे उत्तर कोण देणारं याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

दोन वर्षापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीसच घरफोडीचा गुन्हेगार?

स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात 2023 मध्ये अटक केली होती, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नरेश डाहूले यांना ऑनलाइन गेम, जुगार व शेअर मार्केटचा चांगलाच छंद जडला होता, मात्र या छंदात त्यांनी लाखो रुपये गमावले, 22 लाखांचे कर्ज झाल्यावर आता ते फेडायचं कसं हा विचार त्याच्या मनात आला, आणि त्याने पोलीस वर्दीत राहून गुन्हेगारीचा मार्ग निवडला होता.

दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांचे ठाणेदाराविरोधात तक्रार?

जिल्ह्यात काही पोलीस अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःचं कायदा हातात घेत असल्याचे भयावह चित्र दिसतं आहे, अवैध व्यवसायी व गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सोडून पत्रकारावर व स्वतःच्याच पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे काम ठाणेदार करतं असून दुर्गापूर ठाणेदार संदीप एकाडे यांची एकाधिकरशाही आणि अश्लील अर्वांच्य भाषेत स्वतःच्याच पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ याबाबत काही पोलीस कर्मचाऱ्यानी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार केली होती, पण चौकशी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्याकडे जो अहवाल तयार करण्याचे काम होते तो अहवाल संदीप एकाडे यांना कळला कसा हा महत्वाचा प्रश्न असून त्यांनी तक्रार देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भर गिनती च्या वेळी दुर्गापूर चा ठाणेदार संदिप एकाडे चा दावा केला की मी SP ला सेट केले आता तुम्हाला करतो असे म्हणून एकाचा काटा चिमूर ला काढला, बाकी चे वणी कॅम्प, जिवती, पहाड साठी तैयार राहा? अशी धमकी दिली, मात्र अजूनपर्यंत याचेवर कारवाई नाही त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.