Home Breaking News चंद्रपुरात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा

चंद्रपुरात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपुरात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा

चंद्रपूर  :-  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे चंद्रपूर (शहर) उपाध्यक्ष ॲड.अरुण घोटेकर आणि सचिव स्वप्नील रमेश कांबळे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपच्या चंद्रपूर (शहर) अध्यक्ष राहुल पावडे यांच्याकडे आपल्या राजीनामे सादर केले.

News reporter :- अतुल दिघाडे

ॲड. राहुल घोटेकर यांचा राजीनामा विशेषतः चर्चेत आहे, कारण ते चंद्रपूर शहर महापालिकेच्या जटपुरा प्रभाग क्रमांक 7 चे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिका झोन क्रमांक 1 चे अध्यक्षपद आणि स्थायी समितीचे सदस्यपदही भूषवले आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी ते सक्रिय होते.

राजीनाम्याच्या नेमका कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु राहुल घोटेकर यांचा काँग्रेसकडे वळण्याचा विचार सुरू असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे, आणि लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपसाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो, विशेषतः त्याच्या सामर्थ्यावर याचा परिणाम होऊ शकतो.

राजकीय वर्तुळात या चर्चांनी तीव्रता पकडली असून, पुढील एक-दोन दिवसांत अधिक माहिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये होणाऱ्या या उलथापालथीमुळे चंद्रपूरचा राजकीय रंग बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here