Home Breaking News माझी लाडकी बहिन योजना: दिवाळी बोनसची गोड बातमी

माझी लाडकी बहिन योजना: दिवाळी बोनसची गोड बातमी

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

माझी लाडकी बहिन योजना: दिवाळी बोनसची गोड बातमी

चंद्रपूर  :-  महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ‘माझी लाडकी बहिन योजना’ अंतर्गत सर्व बहिणींच्या खात्यावर 5500 रुपयांचा दिवाळी बोनस पाठवला आहे. या योजनेचा तिसरा हप्ता काही दिवसांत येणार असून, चौथा हप्ता बोनसच्या स्वरूपात उपलब्ध झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. याअंतर्गत, पहिला हप्ता 3000 रुपये आणि दुसरा हप्ता 1500 रुपये पाठवण्यात आला. आता, दिवाळीच्या निमित्ताने 5500 रुपयांचा बोनस समाविष्ट करण्यात आला आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

महाराष्ट्रात निवडणुकांचा हंगाम सुरू असताना, मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यात 3000 रुपये आणि 2500 रुपये यांचा एकूण 5500 रुपयांचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे पात्र महिलांना विशेषतः दिवाळीच्या सणाच्या काळात मोठा आधार मिळाला आहे.

योजना अंतर्गत अर्ज केलेल्या सर्व महिलांना या रकमेचा लाभ मिळेल. सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक स्थिरता येईल, याची खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here