Home चंद्रपूर विजय :- लोकसभेच्या पराभवानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा विजय.

विजय :- लोकसभेच्या पराभवानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा विजय.

“बाप तो बाप रहेंगा” ची धून वाजवून कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. “टायगर अभी जिंदा है” च्या घोषणा.

चंद्रपूर :-

मागील लोकसभा निवडणुकीत तब्बल 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त मतांनी हरणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हरवणं सोपं आहे असं म्हणत जो तो कांग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून तडफडत होता, जणू प्रतिस्पर्धी उमेदवारांना वाटतं होतं की सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात गेलेलं जनमत आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणूकी वेळी तब्बल 48 हजार मतांनी झालेली पीछेहाट कांग्रेस ला जिंकण्याचं बळ देईल, एवढं कमी झालं की काय म्हणून स्वपक्षीय नेत्यांची सुद्धा वक्रदृष्टी सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाला अडसर ठरत होती, मात्र उत्कृष्ट प्रचार यंत्रणा व विकास कामाचा लेखाजोखा जनतेला भुरळ पाडणारा ठरला असल्याने प्रतिस्पर्धी कांग्रेस चे उमेदवार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि अख्खा मूल बल्लारपूर पोंभुर्णा परिसर पिंजून काढून मीच पुढील आमदार म्हणून स्वतःला प्रेझेन्ट करणाऱ्या डॉ अभिलाषा गावतुरे यांना सुधीर मुनगंटीवार यांनी धोबीपच्छाड देऊन जो विजय संपादन केला तो खरोखरच “बाप तो बाप रहेगा” या गाण्याला सार्थक ठरला आणि “टायगर अभी जिंदा है.” या कार्यकर्त्यांच्या घोषणांना बळ देणारं ठरला.

तब्बल 6 वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी हरणार असे भाकीत अनेक राजकीय विश्लेषक करत होते, कारण लोकसभा निवडणुकीत त्यांना तब्बल 48 हजार मतदान प्रतिस्पर्धी कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यापेक्षा कमी मिळाले, परंतु मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूकीच्या पराजयाची कारणमीमांसा करून व चुका लक्षात घेऊन ज्या पद्धतीने आपल्या प्रचार तंत्रात बदल केला आणि सामाजिक माध्यमाद्वारे आपला प्रचार मतदारापर्यंत पोहचवीला त्यामुळे त्यांना 26047 मतांनी विजय मिळाला आहे. दरम्यान सुधीर मुंगनटीवार यांचा विजय खऱ्या अर्थाने जनसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी वरदान ठरणारा आहे असे मतं अनेकांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here