Home गडचिरोली माझा नेता माझा स्वाभिमान वाढदिवस विशेष कार्यक्रम

माझा नेता माझा स्वाभिमान वाढदिवस विशेष कार्यक्रम

माझा नेता माझा स्वाभिमान

वाढदिवस विशेष कार्यक्रम

मौजा कुरुड तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली

चंद्रपूर:-आज दिनांक १२/१२/२३ रोज मंगळवारला माझे नेते मार्गदर्शक राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते श्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मौजा कुरुड येथील मुलींची केंद्रीय कन्या शाळा त्याचप्रमाणे मुलांची केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय नोटबुक व इतर साहित्य वाटप करून भाऊंचा व ताईंचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात नोटबुक वाटप करण्यात आले विशेषता देसाईगंज महिला तालुकाध्यक्ष सौ पुष्पाताई कोहपरे, कुरुड गावच्या सरपंच सौ प्रशालाताई अविनाश गेडाम यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.*
*कार्यक्रमासाठी उपस्थित जेष्ठ काँग्रेस नेते विजय कुंभलवार, युवा नेते गणेश भोयर महिला तालुका उपाध्यक्ष करेजा शेख, महिला कोषाध्यक्ष जयारा शेख, काँग्रेस कमिटी महिला गाव अध्यक्ष रीना शेंडे, महिला उपाध्यक्ष दिपाली सोनबावने आणि केंद्रीय कन्या शाळा मुख्याध्यापिका कु.सौ.धनश्री मिसार,स.शिक्षीका किरण ठाकरे मॅडम,स.शिक्षीका कु.रश्मी चांदेकर मॅडम प्राथमिक मुलांची शाळा मुख्याद्यापिका सौ. वर्णीका हजारे मॅडम , स. शिक्षक श्री. दिवाकर ढवळे सर , स. शिक्षिका कु. मनिषा प्रधान मॅडम व कार्यकर्ते उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here