Home Breaking News मोठी बातमी आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू होणार ?

मोठी बातमी आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू होणार ?

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मोठी बातमी आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू होणार ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: तयारी आणि भविष्य

महाराष्ट्र  :-  केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा दौरा नुकताच पूर्ण केला. या दौऱ्यात दिवाळीपूर्वी निवडणुका होण्याचे संकेत दिले गेले आहेत. 10 ऑक्टोबरला दोन राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसऱ्या निवडणुकीची घोषणा करता येणार नाही. त्यामुळे 13 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा होईल आणि त्याचवेळी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

महाराष्ट्रातील नव्या विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात यायला हवी. त्यासाठी मतदान होऊन निकाल लागणे आवश्यक आहे. आचारसंहितेनुसार, निवडणूक झाली की 45 दिवसांच्या आत नवीन विधानसभा गठीत करणे अनिवार्य आहे. जर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घेतले, तर आचारसंहिता 15-16 ऑक्टोबरच्या दरम्यान लागू करावी लागेल.

राजकीय पार्श्वभूमी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय नाट्यामुळे सर्वच पक्षांच्या गणितांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजयाबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत.

निवडणूक कार्यक्रम

– आचारसंहिता लागू होण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2024
– मतदान : 19 नोव्हेंबर 2024
– निकाल : 22 नोव्हेंबर 2024

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्यांच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे, जिथे महाराष्ट्रातील भविष्याचा आकार घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here