Home वरोरा गौरवास्पद :- महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित भाऊराव चिवंडे यांचा थरारक जीवन प्रवास

गौरवास्पद :- महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित भाऊराव चिवंडे यांचा थरारक जीवन प्रवास

वरोरा येथे पहिले मुलीचे वसतिगृह निर्माण करून ग्रामीण क्षेत्रातील गरीब मुलींसाठी उघडले शिक्षणाचे दरवाजे.

अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे व वरोरा येथे पहिले मुलीचे वसतिगृह निर्माण करून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा सामाजिक वारसा जोपासणारे भाऊराव गंगाराम चिवंडे यांचा जीवन प्रवास अतिशय थरारक व तितकाच प्रेरणादायी आहे, कारण अगदी सहाव्या वर्गात असतांना आई मरण पावली व त्यानंतर वडील सुद्धा मरण पावले, त्यामुळे शिक्षणासाठी पैसे नाही अशा कठीण परिस्थितीत 1950 च्या दशकात शैक्षणिक संघर्ष करून बिएससी पर्यंतचे शिक्षण घेणं पाहिजे तेवढं सोपं नव्हतं पण डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संघर्षाची प्रेरणा घेऊन भाऊराव चिवंडे यांनी सगळ्यां अडचणीवर मात करून जे अभूतपूर्व यश संपादन केलं ते आजच्या तरुण पिढीला खरोखरच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच पुणे येथे त्यांना यावर्षीचा “महाराष्ट्र रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

वरोरा येथील अभ्यंकर वार्ड सुयोग नगर मध्ये भाऊराव चिवंडे यांनी मुलींचे वसतिगृह काढून ग्रामीण भागातील मुलींना शहरात शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली, केवळ वसतिगृहाची इमारतच नव्हे तर त्या वसतिगृहात संपूर्ण सुविधासह झोपायला बेड आणि अंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था पण करण्यात आली आहे, शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्य करत असतांना ग्रामीण भागात शिक्षणाची काय अवस्था आहे हे त्यांनी जवळून पहिले आणि म्हणूनच त्यांनी मुलींसाठी एक चांगलं सुसज्य असं वसतिगृह निर्माण केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा पुणे येथे “महाराष्ट्र रत्न पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला, त्यांच्या या संपूर्ण सामाजिक संघर्षात त्यांच्या पत्नी कामिनी भाऊरावजी चिवंडे यांचे मोठे योगदान आहे. भाऊराव चिवंडे यांच्यासोबत जणू त्यांच्या पत्नी ज्योतिबा संग सावित्री सारख्या सावली प्रमाणे राहिल्या म्हणूनच त्यांना सामाजिक कार्यात आपले सर्वोच्य योगदान करता आले. वरोरा येथील मुलींचे वसतिगृह हे बुद्धिष्ठ कर्मचारी समिती वरोरा द्वारे चालविण्यात येत आहे जेष्ठ नागरिक संघामध्ये भाऊराव चिवंडे हे पदाधिकारी असून ते सतत कार्यरत आहेत.

भाऊराव चिवंडे यांचा जन्म भद्रावती तालुक्यातील भटाळी येथे झाला, त्यांचं प्राथमिक शिक्षण वरोरा तालुक्यातील जामगावं खुर्द येथे झालं तर माध्यमिक शिक्षण सिद्धार्थ विद्यालयात आणि बिएससी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, शिक्षण झालं. विपरीत परिस्थितीत शिक्षण झाल्यानंतर लोक विद्यालय तळोधी येथे शिक्षक म्हणून ते 1966 मध्ये रुजू झाले, तिथे 9 वर्ष नौकरी केल्यानंतर 1975 मध्ये नेताजी विद्यालय वरोरा येथे एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्त झाले त्यानंतर ते 1981 मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून राजुरा येथे पोस्टिंग त्यानंतर सिंदेवाही चिमूर वरोरा पोस्टिंग सन 2002 मध्ये उत्कृष्ट शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषद तर्फे सत्कार. शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे विभागीय सल्लागार म्हणून एक वर्ष चंद्रपूर गडचिरोली येथे कार्य केलं. त्यांची स्वतःची मुलं उच्चंशिक्षित आहे आणि ते आपल्या सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारा पेन्शनचा पैसा मुलीच्या वसतिगृहात खर्च करतात त्यामुळे त्यांच्या या आदर्शाची सर्वत्र चर्चा होतं आहे, त्यांच्या या कार्याने सर्वाना प्रेरणा मिळो आणि त्यांना दीर्घायुष्य मिळो हिचं प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here