Home वरोरा धक्कादायक :- वरोरा शहरात नितीन चुटे याची चाकूने वार करून निर्घृण हत्त्या.

धक्कादायक :- वरोरा शहरात नितीन चुटे याची चाकूने वार करून निर्घृण हत्त्या.

आरोपी अमोल नवघरे पोलिसांच्या जाळ्यात, दुसरा आरोपी फरार,हल्ल्याचे कारण मात्र गुलदस्त्यात?

वरोरा :

शहरात गणपती विसर्जन मिरवणूक अगदी शांततेत पार पडल्यानंतर काही तासातच एक धक्कादायक बातमी कांनी पडताच शहरातील नागरिकांच्या हृदयाचे ठोके आवाज करू लागणारी घटना शहरातील साई मंगल कार्यालयासमोर घडली आहे, अगदी शुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असणाऱ्या अमोल नवघरे वय 35 वर्ष राहणार जिजामाता वार्ड वरोरा यांनी अंदाजें 6:30 च्या सुमारास अमोल नवघरे नावाच्या व्यक्तीने सचिन चुटे याला चाकूने कोथ्यात व छातीत वार करून जागीच ठार केल्याची माहिती रात्री 7:00 च्या सुमारास समोर आली,

या घटनेची माहिती शहरात सर्वत्र पसरताच शहरातील नागरिक साई मंगल कार्यालयाच्या दिशेने घटना स्थळी पोहचले, मात्र पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृत झालेल्या नितीन चुटे याला उपजिल्हा रुग्णालयात पोहचवून आरोपी अमोल नवघरे याला अटक केली आहे, या घटनेने अख्ख शहर हादरलं असून वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे, दरम्यान आरोपी सोबत पुन्हा एक साथीदार असल्याची चर्चा आहे, त्यातच त्याचा भाऊ असल्याची पण माहिती आहे, मात्र तो फरार होण्यास यशस्वी झाला आहे, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीसाची एक तुकडी रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान शांतताप्रीय असलेल्या वरोरा शहरात अशा प्रकारे चाकूने वार करून एका युवकांला ठार करण्याची वर्षातील ही पहिलीच घटना आहे, या घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल यांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये भेट देऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेऊन आवश्यक सूचना पोलिसांना केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here