Home वरोरा इशारा :- वरोरा येथील टोल येणाऱ्या 15 दिवसात बंद करा मनसेचा टोल...

इशारा :- वरोरा येथील टोल येणाऱ्या 15 दिवसात बंद करा मनसेचा टोल कंपनी ला अल्टीमेट

मनसे वाहतूक सेनेचे बाळू गेडाम व जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील टोल कंपनीला मनसेचे निवेदन.

वरोरा:-

मागील अनेक वर्षांपासून वरोरा येथील उडानपूल बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या टोल कंपनी कडून टोल वसुली सुरू असताना कंपनी कडून रस्त्यावर असुविधा आहे व मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहरात येणाऱ्या हजारो जडवाहन धारकांकडून टोल वसुली जोरात सुरू आहे, त्यामुळे हा कपंनीचा टोल नाका येत्या 15 दिवसात बंद करावा अन्यथा हा टोल नाका फोडला जाईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे, यावेळी वाहतूक सेना वरोरा तालुका अध्यक्ष बाळू गेडाम यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश राजूरकर, सुनील गुढे, बल्लारपूर जनहित तालुका अध्यक्ष राज वर्मा, तालुका संघटक राम पाचभाई, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, मनविसे तालुका अध्यक्ष रमेश नामे, शहर सरचिटणीस प्रतीक मुडे, विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर, शहर उपाध्यक्ष संदीप धानोरकर, उपविभाग अध्यक्ष धनराज बाटबरवे इत्यादीची उपास्थिती होती..

वरोरा शहरात येणाऱ्या उडान पुलाच्या बांधकाम खर्चाची भरपाई करण्यासाठी मागील 20 वर्षांपासून वरोरा शहरात व शहरातून वणी मार्गे जाणाऱ्या जड वाहन धारकांकडून टोल वसुली सुरू आहे, परंतु टोल वसुली करतांना टोल कंपनीकडून ज्या मुलभूत सुविधा करायला हव्या त्या सुविधा कुठेच दिसतं नाही, खरं तर प्रत्येक टोल नाक्यावर वाहनांनुसार टोल दराचे फलक स्पष्टपणे लावलेले असावेत, जेणेकरून प्रवाशांना दरांची माहिती सहज मिळेल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार, वाहने टोल नाक्यावर ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबवता येणार नाहीत. जर जास्त वेळ लागला, तर प्रवाशांना टोल न घेता सोडले जाईल. टोल रस्त्यांवर अपघात किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि आपत्कालीन सेवा जसे ऍम्ब्युलन्स उपलब्ध असणे अपेक्षित आहे. परंतु या सर्व सुविधा या टोल नाक्यावर दिल्या जात नाही आणि नियम पाळले जात नाही, शिवाय 20 वर्षांपासून बेकायदेशीर टोल वसुली करून जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले.

या कंपनीच्या टोल कडे जर एखादा अपघात झाला तर रुग्णवाहिका नाही, टोईंग गाडी नाही, पथ दिवे पूर्णतः सुरू नाही, रोडवर कुठल्याही प्रकरचे पट्टे नाही, रस्त्याच्या कडेचे पांढरे पटे पूर्णतः नष्ट झाले आहे, दिशाफलक तुटलेले आहे. रस्त्याची साफसफाई तर होतच नाही, पिण्याच्या पण्याची व्यवस्था नाही, नागपूर चंद्रपूर कडूं येनाऱ्या बस ला डेपो मधे जाण्याकारिता टोल वर स्पेस नाही, गाडी वळती करिता त्रास होत आहे, टोल व्हॅरिल पुलच्या सलाखी बाहेर निघाल्या आहे, लोक पुलाला रंगवूंन जहिरात करत आहे पण कंपनीचे लक्ष नाही, मुख्य प्रवेश चौकी ला डावीकडे आय टी आय आहे , एसटी बस चा पण मार्ग तोच आहे, अतिक्रमण येवढे वाढले की , छोटे व्यवसायिक रस्त्यावर आले आहेत, माढेळी वरुण येनारी बस विरुद्ध बाजुने येते आहे इत्यादी समस्यांनी वेढलेला हा टोल नाका समस्यांनी ग्रासला असताना टोल कपंनी व्यवस्थापन लक्ष न देता केवळ टोल वसुली करतं असल्याने हा बेकायदेशीर टोल नाका येणाऱ्या 15 दिवसात बंद करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या परिसरातील जड वाहन धारकांना न्याय देण्यासाठी मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here