Home Breaking News भारताचे शिल्पकार सर डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन कार्यक्रम उत्साहात

भारताचे शिल्पकार सर डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन कार्यक्रम उत्साहात

भारताचे शिल्पकार सर डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन कार्यक्रम उत्साहात

चंद्रपूर दि,20,स्टेबर 2025  :- चंद्रपूर येथे सबोर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन (म.रा.वि.मं.) तर्फे भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन कार्यक्रम चंद्रपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील अभियंत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

News reporter :- अतुल दिघाडे

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभि. श्री. लक्ष्मण राठोड यांनी भूषविले. उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून अभि. श्री. अविनाश निंबाळकर, संचालक प्रकल्प महापारेषण, तसेच अभि. श्री. सतीश अणे, मुख्य अभियंता नागपूर, महापारेषण उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सरचिटणीस अभि. श्री. संतोष खुमकर, संघटन सचिव अभि. श्री. नारायण चकोर, राज्य समन्वयक अभि. श्री. आकाश जयसिंगपुरे तसेच सहसचिव जयवंत पराते यांची विशेष उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानी असलेल्या अभि. श्री. लक्ष्मण राठोड यांनी अभियंत्यांच्या सामाजिक बांधिलकीवर भर दिला.ते म्हणाले की – “तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा उपयोग सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी करणे ही अभियंत्यांची खरी जबाबदारी आहे.”

अभि. श्री. अविनाश निंबाळकर यांनी वीज व ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांचा वेध घेतला.
त्यांनी सांगितले की – “शाश्वत ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आत्मसात करणे हे भविष्यातील अभियंत्यांसाठी अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागापर्यंत विश्वासार्ह वीज पोहोचविण्यासाठी अभियंते कटिबद्ध राहावे.”
याव्यतिरिक्त एस ई ए चंद्रपूर वर्धा गडचिरोली टीम ने सामाजिक बांधिलकी म्हणून आश्रय छात्रावास चंद्रपूर आणि *क्रांती हिंदी प्राथमिक शाळेला गरजू वस्तूची भेट दिली. तसेच १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली.

यावेळी इतर मान्यवरांनी देखील अभियंता संघटनेची एकजूट, सामाजिक बांधिलकी व तंत्रज्ञानाचा शाश्वत विकासासाठी उपयोग यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वरिष्ठ व तरुण अभियंते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here