शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचे खांबाडा येथे आयोजन, कृषी विभागाच्या संशोधकांची उपस्थिती. शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी.
खांबाडा (मनोहर खीरटकर ):-
आधुनिक पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली तर उत्पन्नात वाढ होते आणि त्यासाठी कृषी विभागाचे संशोधक प्रयत्न करताहेत, दरम्यान काल दिनांक 31/08/2025 रोजी खांबाडा येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमा अंतर्गत सोयाबीन पीक शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान यावेळी शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी आणि त्यावर येणाऱ्या रोगाची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आली.
सदर प्रशिक्षणामध्ये डॉ. प्रशांत एन .राखुंडे( असिस्टंट प्रोफेसर प्लांट पॅथॉलॉजी) यांनी सोयाबीन पिकावरील रोग तसेच कापूस पिकावरील रोगांची ओळख व त्यावरील नियंत्रणा संबंधी सविस्तर माहिती दिली. श्री एन डी गजबे (असिस्टंट प्रोफेसर इंटोमोलॉजी) यांनी सोयाबीन व कापूस पिकावर आढळणाऱ्या मुख्य किडींची ओळख तसेच त्यावरील उपाययोजना संबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ.श्रीकांत ब अमरशेट्टीवार (सहयोगी संशोधन संचालक) यांनी कापूस पिकाच्या लागवडी पासून ते वेचणी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापनासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री जी के पाटील (मं.कृ.अ.टेमुर्डा ) श्री.ए .बी. गोखरे (उप. कृ.अ. टेमुर्डा 2 )श्री. पी. एस. लोखंडे (उप कृ.अ.टेमूर्डा1) तसेच गावातील शेतकरी बांधव बहुसंख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित होते. श्री अनिल देवराव आरू( सहाय्यक कृषी अधिकारी- खांबाडा) यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.