Home चंद्रपूर बनावट दस्तऐवज करून  प्रशासकीय मंडळावर पद ग्रहण करणाऱ्यांवर  फौजदार कारवाई करा.

बनावट दस्तऐवज करून  प्रशासकीय मंडळावर पद ग्रहण करणाऱ्यांवर  फौजदार कारवाई करा.

उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व संयोजक रूपेश निमसरकर यांनी डिजिटल मिडिया पत्रकार परिषदेत केली मागणी.

चंद्रपूर :-

पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये खोटया व बनावट दस्ताऐवजांच्या आधारे प्रशासक म्हणुन पदग्रहण केल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळाली असल्याने पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीमधे प्रशासकीय मंडळाच्या या बोगस संचालकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषद घेवून रूपेश निमसरकर यांनी केली याप्रसंगी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे नेते राजू झोडे उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधे सदर आरोपींनी सदर केलेल्या कागदपत्राची मागणी केली असता व त्या  दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता कागदपत्रात हेराफेरी धोकाधडी करून यांनी प्रशासकाचे पद ग्रहण केले असे लक्षात आले. चक घोसरी येथील दामोदर येल्ला चिमलवार यांच्या सर्वे नं.123/1 या जमीनीच्या सातबारावर खोडतोड करून गाव चक घोसरीच्या ऐवजी थेरगाव तसेच तालुका मुल च्या ऐवजी पोंभुर्णा केले व दामोदर येल्ला चिमलवार यांच्या सोबत लिलाबाई विलास कावटवार व आशिष विलास कावटवार असे खोटे नाव संगणकादवारे केले आणि तो खोटा सातबारा खरा आहे म्हणुन दि. 4/2/2020 रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष दाखवून शपथपत्र केले अर्थात बनावट दस्ताऐवजांच्या आधारे प्रशासक पद ग्रहण करण्याकरीता खरे दस्ताऐवज म्हणुन आशिष कावटवार यांनी उपयोग केला.

सोबतच अतिक अहेमद कुरेशी हे जनता विदयालय, येथे शिक्षक म्हणुन नोकरी करतात तसेच नगरपंचायत पोंभुर्णा येथे नगरसेवक या पदावर असताना सुध्दा आहे परंतु मी शेती व्यवसाय करतो म्हणुन त्यांनी खोटे शपथपत्र सादर केले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा व शासनासोबत त्यांनी सुद्धा धोकाधडी व फसवेगीरी केली आणि जो कोणी खरा उमेदवार होता त्याला त्याच्या लाभापासुन वंचीत ठेवले.

या दोन्ही व्यक्तींनी स्वतःच्या फायद्यासाठी बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून प्रशासनाची दिशाभूल व कागदपत्रांची हेरफेरी करून नियमांचा भंग केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार करून खऱ्या लाभार्थी यांना संधी देण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे व जिल्हा संयोजक रूपेश निमसरकर यांनी केली, याप्रसंगी संघटनेचे इतर सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here