Home वरोरा खळबळजनक :- दुकाने निरीक्षक कार्यालयाचे बाबू असल्याचे सांगून गोवर्धन कैथवास यांची दुकानदारांकडून...

खळबळजनक :- दुकाने निरीक्षक कार्यालयाचे बाबू असल्याचे सांगून गोवर्धन कैथवास यांची दुकानदारांकडून अवैध वसुली ?

भाडे तत्वावर कार्यालयाकरिता दिलेल्या खोल्यात  मालकानीच सुरू केली दुकानदारी ! कारवाई ची मागणी !

वरोरा प्रतिनिधी :

कोण कधी, कसा संधीचा फायदा घेवून समाजात अवैध काम करेल याचा नेम नाही असाच प्रकार वरोरा येथे घडला असून चक्क घरमालकच दुकाने निरीक्षक बनून वरोरा मूल आणि ब्रम्हपुरी या तालुक्यातील दुकानाला भेटी देवून अवैध वसुली करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,
वरोरा येथे गोवर्धन कैथवास यांच्या घरी दुकाने निरीक्षक यांचे कार्यालय, शिवाजी चौक, येथे आहे, वरोरा,मुल ,ब्रम्हपुरी अशा तीन तालुक्यात दुकानदाराकडून सरकारी चालान म्हणून फी रु 23.65 घ्यायचे प्रावधान आहे, मात्र जे मूळ निरीक्षक आणि लिपिक म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते बाजूला असून चक्क घरमालक गोवर्धन वरील तहसिल ला जाऊन दुकान मालकाला स्वतः बाबू मी आहे, असे सांगतो आणि कार्यालयाची दिशाभूल केली जाते, मात्र
स्वतः सरकारी कर्मचारी आहे असे दुकान मालकांना सुद्धा ते फसवत असल्याने त्यांच्या या क्रूत्यामुळे संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त किंव्हा संबंधित अधिकारी अनभिज्ञ कसे ? हा सवाल सुद्धा या अर्थाने समोर येत आहे.
खरं तर सरकारी ऑफिस, वरोरा बसस्टाप,जवळ असंल पाहिजे, मात्र मुख्य शहारा बाहेर दुकाने निरीक्षका चे कार्यालय स्वतः घरमालकांनी आणले आहे, ते ऑफिस शहरामध्ये असावे,
काही काळ ते ऑफिस शहरामध्ये होते. परंतु घरमालकांनी युरीन, टायलेट ऑफिस मधे येणाऱ्यांना मागील पाच वर्षा पासून बंद करण्यात आले असुन ऑफिस चे कर्मचारी यांना रेलवे स्टेशन वरोरा येथे नेहमी जावे लागते. अर्थात स्वतः घरमालक च दुकाने निरीक्षकाच्या भूमिकेत असल्याने या गंभीर बाबिकडे कोण बघणार ? व या भामट्याला कोण जेरबंद करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here