Home भद्रावती धक्कादायक :- स्टंट करण्याच्या नादात एका 15 वर्षीय विद्यार्थ्यांची फासी घेऊन आत्महत्त्या.

धक्कादायक :- स्टंट करण्याच्या नादात एका 15 वर्षीय विद्यार्थ्यांची फासी घेऊन आत्महत्त्या.

भद्रावती येथील सेंट्यानिक स्कुल चा विद्यार्थी, भोयर परिवारावर संकट. या घटनेने आई वडिलांचे टेन्शन वाढले 

भद्रावती :-

भद्रावती शहरातील सेंट्यानिक स्कुल मध्ये 10 वी मध्ये शिकणाऱ्या यथार्थ सुभाषराव भोयर वय 15 वर्ष राहणार वर्धा या विद्यार्थ्याने स्टंट करण्याच्या नादात स्वतःला फाशी घेण्याची प्रॅक्टिस करत असतांना त्याची आत्महत्या झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी त्यांचे राहते घरी घडली असून प्राथमिक तपासात त्याने स्टंट केला असावा असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

शेंट्यानिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 10 वीत शिकत असलेला यथार्थ हा शाळेतून घरी शिंदे पेट्रोल पम्प च्या मागील वस्तीत आपल्या रूमवर आला आणि घरी एकटाच असतांना एकांतात त्याने फासी घेण्याची निर्णय घेतला पण असे काय झाले किंव्हा त्याचेवर काय दबाव होता का हा तपासाचा भाग असला तरी आई ड्युटीवर गेली असल्याचा फायदा घेत त्याने केलेली आत्महत्या हा संशोधनाचा विषय ठरत आहे, आईसोबत तो भद्रावती येथे राहत होता तर वडील हे वर्धा येथे राहत होते, दरम्यान आज 12 ते 1. 00 च्या दरम्यान त्याने केलेली आत्महत्या सर्वाना आश्चर्यचकित करणारी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here