Home वरोरा दखलपात्र :- टेमुर्डा येथील देशी दारू दुकानाच्या मंजुरीचा डाव ग्रामस्थानी उधळला.

दखलपात्र :- टेमुर्डा येथील देशी दारू दुकानाच्या मंजुरीचा डाव ग्रामस्थानी उधळला.

महिला, युवा, पुरुष यांच्या आक्रोशापुढे प्रशासनाने ग्रामसभा आटोपली, दारू दुकान व्यवसायिकांचे लाखों रुपये पाण्यात?

टेमुर्डा /वरोरा
( धनराज बाटबरवे ):-

टेमुर्डा येथे देशी दारू दुकान उघडण्याची परवानगी घेण्यासाठी झालेली ग्रामसभा नागरिकांनी उधळलीअसून नागरिकांच्या आक्रोशा पुढे ग्रामपंचायत प्रशासनाने हीं सभा तहकूब करण्याची घोषणा केली, दरम्यान ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी ग्रामस्थाना जाहीरपणे माहिती न देता देशी दारू दुकानदार यांच्यामार्फत महिलांना पैसे वाटप करून देशी दारू दुकानाला मंजुरी करण्याचा घाट घातल्या होता, मात्र त्या विरोधात टेमुर्डा येथील मोठ्या संख्येने महिला व पुरुष यांनी गर्दी करून आवाजी मतदानाने या ठरावाचा विरोध केला असल्याने यापुढे टेमुर्डा येथे यानंतर कुठलीही देशी दारू दुकानाकरिता ग्रामसभा घेऊ नये अशी मागणी ग्रामस्त महिलांनी ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्याकडे केली. या ग्रामसभेला महिला, युवा, पुरुष यांच्या आक्रोशापुढे प्रशासनाने ग्रामसभा आटोपली, मात्र दारू दुकान व्यवसायिकांचे यामुळे लाखों रुपये पाण्यात गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अशीच ग्रामसभा सन 1993 मध्ये घेण्यात येऊन येथील देशी दारू दुकान हटविण्यात आले होते अशी माहिती आहे.

टेमुर्डा येथे देशी दारू दुकान थाटण्यासाठी सुरेश टिकाराम अहिरकर या परवाना धारकाच्या आडून अंजु अन्ना यांना देशी दारू दुकानाची परवानगी (ना हरकत) देण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायत ची महिला ग्रामसभा व नंतर सर्वसाधारण ग्रामसभा बोलवून ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा प्लॅन आखला होता, त्यासाठी दिनांक 18 जुलै च्या महिला ग्रामसभेची माहिती गावातील महिलांना कळू न देता एका वार्डातील शंभराच्या वर महिलांना हजार ते दोन हजार देऊन त्यांना महिलांच्या ग्रामसभेला उपस्थित ठेऊन तो ठराव मंजूर कारण्याचं छडयंत्र रचण्यात आलं होत, मात्र टेमुर्डा ग्रामपंचायत च्या माजी सरपंच संगीता आगलावे, ग्रामपंचायत सदस्या संगीता तिखट, प्रतिभा नक्षीने, दुर्गा आगलावे, ज्योतीताई ठावरी, माधुरी अंड्रस्कर, उजवला नक्षीने, मंगला गुजरकर, लोभा वासेकर, इंदाबाई आत्राम या महिलांच्या आक्रमक पवित्र्याने व त्यांच्याद्वारे गावातील महिलांना सतर्क करून त्यांना ग्रामसभा स्थळी बोलावल्याने देशी दारू दुकान सुरू कारण्यबाबतचा ठराव 102 विरुद्ध 121 अशा फरकाने ना मंजूर करण्यात आला होता, आता आपण पहिली लढाई हरलो असे समजल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 जुलैला त्यांनी मोठा बंदोबस्त केला आणि सर्वसाधारण ग्रामसभा दिनांक 19 जुलै ला ठेऊन दोनसेच्या वर ग्रामस्थाना पैसे देऊन उपस्थित करण्यात आले होते, मात्र आक्रमक महिलांच्या पुढे पैसे देऊन आणलेल्या महिला व पुरुषांची कुठेही चालली नाही पर्यायाने हीं ग्रामसभा आटोपती घेऊन सभा तहकूब करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली, यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भोयर व गावकऱ्यांची आक्रमक भूमिका पण महत्वाची ठरली दरम्यान ज्याअर्थी उपस्थित ग्रामस्थानी रजिष्ट्ररवर सह्या केल्या आणि आवाजी मतदानाने ठरावाच्या विरोधात घोषणा दिल्या याचा अर्थ ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी मांडलेल्या देशी दारू दुकान सुरू करण्याच्या ठरावविरोधात मतदान झाले असल्याने टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाला मंजुरी नाकारण्यात आल्याची बाब उघड होते आणि सचिवानी त्याची प्रोसेडींग मध्ये नोंद घेणे गरजेचे ठरत आहे शिवाय आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 18 जुलैला झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत देशी दारू दुकानला मंजुरी नाकारण्यात आल्याने तोच ठराव ग्राह्य धरून देशी दारू दुकानाला मंजुरी नाकारण्यात येत असल्याची नोंद ग्रामपंचायत सचिवानी करावी अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायत सरपंच सचिव यांची बेकायदेशीर ग्रामसभा?

ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यापैकी चार सभा ह्या सरकारी ठरलेल्या वेळेत करायच्या असतात व दोन सभा ह्या आकास्मिक असतात पण या सभा घेतांना तो विषय जनहिताचा,,आरोग्य आणि शिक्षणाचा असायला हवा, पण टेमुर्डा येथे घेतलेली ग्रामसभा ही देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी घेण्यात आली जी बेकायदेशीर असून दारू सारख्या विषयासाठी स्पेशल ग्राम सभा बोलावून ग्रामस्थाचा वेळ वाया घालवीने चुकीचे आहे, खरं तर ग्रामसभेचे अनेक विषय असतांना त्यात दारू दुकान सुरू करण्याचा विषय येणे हे एक वेळ समजून घ्यायला हरकत नाही पण केवळ दारू दुकान मंजुरी करिता विशेष सभा बोलावणे बोलावणे म्हणजे एका व्यक्तीच्या फायद्यासाठी ग्रामस्थाना वेठीस धरण्याचे काम असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here