Home वरोरा निवड :- वरोरा पथ विक्रेत्या समितीची निवडणूक अविरोध.

निवड :- वरोरा पथ विक्रेत्या समितीची निवडणूक अविरोध.

पथ विक्रेत्यासाठी संघर्ष करणारे संजय नरुले व मनसेच्या महिला तालुका अध्यक्षा रेवती इंगोले यांच्यासह सात जणांची निवड.

वरोरा :-

शहरी पथविकेत्यांचे नियमन तसेच त्यांना उद्योगधंदे चालण्याकरीता पोषक वातावरण उपलब्ध करून देणे याचबरोबर पथविकेत्यांमुळे होणारी गर्दी व आरोग्याची काळजी याचा समन्वय साधणारा पथ विक्रेता ( उपजीविका संरक्षण आणि विक्रीचे विनिमय )अधिनियम 2014 लागू करण्यात आलेला आहे, याच अनुषंगाने पथविकेत्ता समितीच्या निवडणूक घेण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या कामगार अधिकारी यांच्यामार्फत नगर पालिकेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांना निवडणूक अधिकार म्हणून नियुक्त करण्यात आले होते,

मुख्याधिकारी भोयर यांच्या देखरेखित सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली, यामध्ये अनुसूचित जाती मधून सुभाष वावरे अनुसूचित जमाती मधून संजय आत्राम इतर मागासवर्गीय महिला मनिषा लोणगाडगे अल्पसंख्यांक म्हणून अफरोश शेख खुल्या प्रवर्गात प्रवर्ग अ मधून रवींद्र लोणारे खुल्या प्रवर्ग मधून संजय भाऊ नरोले व महिला राखीव मधून रेवती ताई इंगोले यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक अधिकारी गजानन भोयर यांच्या हस्ते 12 जुलै 2014 ला त्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले ,निवडणुकी यशस्वी करण्याकरीता सुरज पुनवटकर सहाय्यक निवडणूक निरीक्षक अधिकारी, झीलपे मॅडम कार्यालय अधीक्षक, गजानन आत्राम संवगअधिकारी, उमेश कथडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी काम पाहिले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here