Home वरोरा आवाहन :- मनसेच्या वरोरा “राजगड” कार्यालयातील जनता दरबारात सोमवारला कर्जमाफी व पीक...

आवाहन :- मनसेच्या वरोरा “राजगड” कार्यालयातील जनता दरबारात सोमवारला कर्जमाफी व पीक विम्याचा प्रश्न.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व पीक विम्याच्या संदर्भातील वंचित शेतकऱ्यांच्या समस्याचे प्रशासन स्थरावर होणार निराकारण.

वरोरा :-

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जवळपास 3 हजार 500 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अंतर्गत कर्जमाफी मिळाली नाही तर 5 हजार नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशीं मिळाली नाही, दरम्यान शेतकऱ्याच्या कर्जमाफी करिता जेष्ठ शेतकरी भदुजी गिरसाळवे यांच्या पुढाकाराने व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात विविध मोर्चे आंदोलन करण्यात आले व वेळोवेळी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मागील हिवाळी अधिवेशनादरम्यान टेमुर्डा येथील रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, त्यावेळी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली मात्र कर्जमाफीचीं अमलबजावणी करण्यात नाही त्यामुळे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मुंबईला मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफिचा फायदा मिळाला नसल्याचे सांगितले त्यामुळं त्यांच्या सहकार्याने नुकत्याच पावसाळी अधिवेशनात त्या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली मात्र यामध्ये अनेक तृट्या असल्याने त्यावर प्रशासनाकडे तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरोरा येथील राजगड कार्यालयात सोमवार दिनांक 22 जुलै ला दुपारी 12.00 वाजता शेतकऱ्यांनी कागदपत्रासह यावं असं आवाहन मनसे शेतकरी सेनेकडून करण्यात येत आहे

वरोरा भद्रावती येथील कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून योग्य तो सल्ला मिळत नसाल्याने शिवाय पीक विम्यासाठी मनसे कडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून त्या पीक विम्यापासून कितीतरी शेतकरी वंचित असल्याने सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा व पीक विम्याचा लाभ मिळावा याकरिता मनसेचा वरोरा येथील “राजगड” कार्यालय ( लोखंडी पाण्याची टाकी शिवाजी वार्ड वीर सावरकर चौक वरोरा मोबाईल 8668242682) येथे संपर्क साधावा असे आवाहन मोहित हिवरकर, भदुजी गिरसावळे, किशोर धोटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here